Vastu Tips : 'या' 3 ठिकाणी चुकूनही बनवू नका देवघर, होईल मोठं नुकसान!

घरात ठेवलेल्या वस्तू वास्तूनुसार ठेवल्या तर त्यांचा घरावर आणि घरात राहणाऱ्या लोकांवर सकारात्मक परिणाम होतो असं मानलं जातं.

Updated: Jul 13, 2022, 09:34 AM IST
Vastu Tips : 'या' 3 ठिकाणी चुकूनही बनवू नका देवघर, होईल मोठं नुकसान! title=

मुंबई : भारतीय संस्कृतीत वास्तुशास्त्राला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. वास्तुशास्त्र हे व्यक्तीच्या जीवनाशी निगडित असतं. वास्तुशास्त्राचे नियम हे व्यक्तीच्या जीवनावर परिणाम करतात. घरात ठेवलेल्या वस्तू वास्तूनुसार ठेवल्या तर त्यांचा घरावर आणि घरात राहणाऱ्या लोकांवर सकारात्मक परिणाम होतो असं मानलं जातं.

मात्र जर या वस्तू चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या जागी ठेवल्या गेल्या तर याचा नकारात्मक प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर होतो. आज आपण घरातील देवघराबाबत बोलणार आहोत. पूजेचं ठिकाण योग्य दिशेने आणि योग्य ठिकाणी असल्यास घरात राहणाऱ्या लोकांच्या जीवनावर त्याचा सकारात्मक परिणाम होतो. 

अनेकदा माहितीच्या अभावामुळे लोक काही चुकीच्या ठिकाणी देवघर ठेवतात, त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. घरातील काही ठिकाणी देवघर किंवा पूजा घर ठेवू नये, असं मानतात. चला तर मग जाणून घेऊया ही ठिकाणं कोणती आहेत.

पायऱ्यांखाली मंदिर नसावं

वास्तूनुसार, तुमच्या घराच्या पायऱ्यांखाली कधीही देवघर किंवा पूजेचं मंदिर नसावं. यामुळे पैशाची कमतरता तर भासतेच सोबतच त्या व्यक्तीला मानसिक तणावंही जाणवू शकतो.

स्नानगृह

तुमच्या घरातील देवघर शौचालय किंवा स्नानगृहाजवळ असू नये. यामुळे जीवनात अनेक अडचणी येऊ शकतात

बेडरूम

घरातील लोकांनी आपलं देवघर बेडरूममध्ये बनवू नये. मात्र जर तुमचं घर लहान असेल आणि तुम्हाला नाईलाजाने बेडरूममध्ये देवघर बनवावं लागत असेल तर तुम्ही देवघराला पडदा लावावा.

(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)