Trigrahi Yog in Scorpio: ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर राशीमध्ये बदल करतात. यामध्ये चंद्र हा सर्वात वेगाने फिरणारा ग्रह मानला जातो. चंद्र हा एका राशीत सुमारे अडीच दिवस राहतो. चंद्राचा दर महिन्याला कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संयोग होतो. यामुळे अनेकवेळा ग्रहांचा संयोग होतो.
10 डिसेंबर रोजी चंद्र वृश्चिक राशीत प्रवेश करेल. या ठिकाणी मंगळ आणि सूर्य आधीच उपस्थित आहेत. अशा परिस्थितीत वृश्चिक राशीमध्ये त्रिग्रही योग तयार होणार आहे. हा योग अनेक राशींसाठी खास सिद्ध होताना दिसतोय. जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी हा योग खास लाभदायक ठरणार आहे.
या राशीमध्ये तृतीय घरात त्रिग्रही योग तयार होणार आहे. या काळात विद्यार्थ्यांना अधिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. परीक्षेत चांगली कामगिरी करणार आहात. कायदेशीर बाबींमध्येही यश मिळू शकणार आहे. तुमच्या आयुष्यात आनंदाचा प्रवेश होईल. जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या काळात असे करणे फायदेशीर ठरू शकते. वैवाहिक जीवन आणि लव्ह लाईफ देखील चांगले राहणार आहे.
कन्या राशीमध्ये मंगळ, सूर्य आणि चंद्र यांचा संयोग होणार आहे. अशा स्थितीत त्रिग्रही योगाचा सकारात्मक प्रभाव या राशीच्या लोकांच्या जीवनात पाहायला मिळणार आहे. संबंधित व्यवसायातही तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. या काळात विद्यार्थ्यांना लाभ मिळू शकतो. उच्च शिक्षणाचे नियोजन करणाऱ्यांनाही लाभ मिळणार आहेत. तुम्हाला धार्मिक कार्यात रस असल्यास प्रवासालाही जाऊ शकता.
त्रिग्रही योगामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे लोक यश मिळवू शकतात. तुमच्या कामाच्या ठिकाणी आदर आणि स्थान मिळेल. करिअरच्या नवीन संधीही उपलब्ध होऊ शकतात. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर या काळात असे करणे फायदेशीर ठरू शकते. या काळात तुमच्या जोडीदाराशी संबंध चांगले राहतील. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळवण्यात यशस्वी होणार आहेत.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )