Janmashtami : श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी या जन्माष्टमीला काय करावे आणि काय करु नये?

Shri krishna janmashtami : देशात प्रामुख्याने उत्तर भारतात श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्सावाची महाराष्ट्रातही जय्यत तयारी केली जाते. श्रीकृष्ण जन्माष्टमीला दिवशी मठ, मंदिरांमध्ये विशेष पूजा केली जाते.  

Updated: Aug 18, 2022, 09:24 AM IST
Janmashtami : श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी या जन्माष्टमीला काय करावे आणि काय करु नये? title=

मुंबई : Shri krishna janmashtami : देशात प्रामुख्याने उत्तर भारतात श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्सावाची महाराष्ट्रातही जय्यत तयारी केली जाते. श्रीकृष्ण जन्माष्टमीला दिवशी मठ, मंदिरांमध्ये विशेष पूजा केली जाते. श्रीकृष्णाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. श्रीकृष्ण पूजेसाठी त्यांचे आवडते कपडे अर्पण केले जातात. धार्मिक मान्यतेनुसार असे केल्याने श्रीकृष्णाची कृपा प्राप्त होते. त्यामुळे  या जन्माष्टमीला काय करावे आणि काय करु नये? याबाबत अधिक जाणून घ्या.

जन्माष्टमीला या गोष्टींना प्राधान्य द्या

- जन्माष्टमीच्या पूजेसाठी तुळशीचे पान नक्की अपर्ण करावे
- या दिवशी पूजेमध्ये श्रीकृष्णाला कमळाचे फूल अर्पण करणेदेखील चांगले असते
- आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी या दिवशी बाळ कृष्णाचा झुला झुलवावा
- जन्माष्टमीला श्रीकृष्णाच्या आवडीचे मोरपीस पूजेच्या सर्व वस्तूंच्यामध्ये ठेवावे त्यासोबतच श्रीकृष्णांच्या आवडीची खीर, पंचामृत, मिठाई, लोणी अशा वस्तू असावाव्या
- पूजा करताना शंखाचा उपयोग करावा.
- जन्माष्टमीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घालणे शुभ असते.
- शक्य असेल तर कृष्ण जन्माच्या दिवशी घरी भजन कीर्तनाचा कार्यक्रम करावा.

जन्माष्टमीला या गोष्टी शक्यतो टाळा

-  श्रीकृष्णाची पूजा करताना कोमजलेली किंवा वाळलेली फुले अजिबात वापरु नये
- श्रीकृष्ण आणि गायींचे खूप घट्ट नाते आहे. त्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी चुकूनही गायीला इजा होईल असे काहीही करु नका.
- जन्माष्टमीच्या दिवशी व्रत करताना तामसी प्रवृत्तीचे पदार्थ खाऊ नये तसेच यादिवशी मांस आणि माद्यपान करु नये
- जन्माष्टमीच्या दिवशी मनात चुकीचे विचार आणू नये किंवा कुणाला अपशब्द बोलू नये.
- जन्माष्टमीच्या पूजेसाठी तुळशीची पाने एक दिवस आधीच तोडून ठेवावी. त्या दिवशी तुळशीचे पान किंवा कोणतेही झाड खूंटू नये.
- जन्माष्टमीच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करु नये, असे अशुभ मानले जाते

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x