Panchang, 31 December 2022: वर्षाच्या शेवटी काय आहेत शुभवेळा, पाहून घ्या आजचं पंचांग

Panchang, 31 December 2022: आज शनिवार (saturday) आहे. 2022 या वर्षाचा शेवटचा दिवस (year end). तसं पाहिलं, तर आजचा हा दिवस म्हणजे संपूर्ण वर्षभरात जे काही घडलं त्याच्याप्रती आपले ऋण व्यक्त करण्याचा

Updated: Dec 31, 2022, 06:50 AM IST
Panchang, 31 December 2022: वर्षाच्या शेवटी काय आहेत शुभवेळा, पाहून घ्या आजचं पंचांग  title=
todays Panchang 31 December 2022 saturday

Panchang, 31 December 2022: आज शनिवार (saturday) आहे. 2022 या वर्षाचा शेवटचा दिवस (year end). तसं पाहिलं, तर आजचा हा दिवस म्हणजे संपूर्ण वर्षभरात जे काही घडलं त्याच्याप्रती आपले ऋण व्यक्त करण्याचा. नव्या वर्षाची नवी सुरुवात करण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत पण, त्यातच सरत्या वर्षालाही एका चांगल्या वळणावर निरोप देण्याचाच निर्णय अनेकांनी घेतला आहे.  तुम्हीही आजच्या दिवशी असंच एखादं शुभकार्य करण्याच्या प्रयत्नांत असाल आणि एखाद्या मुहूर्ताच्या शोधात असाल तर, एकदा पाहा आजचं पंचांग. कारण, आजचा दिवस प्रत्येक राशीसाठी खास आहे. पण, दैनिक पंचांगाच्या (todays panchang)माध्यमातून आपल्याला तिथी, करण, नक्षत्र, सूर्य,  चंद्राची स्थिती, हिंदू महिना आणि पक्ष, शुभ काळ, राहुकाल, सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, इत्यादींबद्दल माहिती मिळणार आहे. (todays panchang 31 December 2022 shubh mahurat )

आजचा वार - शनिवार 
तिथी- नवमी
नक्षत्र - रेवती  
योग - परिघ
करण- कौलव, तैतुल

हेसुद्धा वाचा : Horoscope 31 December : 'या' राशीच्या व्यक्तींना मिळेल अपेक्षित लाभ; कसा असेल तुमचा वर्षातील शेवटचा दिवस?

 

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 07:13 वाजता
सूर्यास्त - संध्याकाळी 05:34 वाजता
चंद्रोदय -  दुपारी 12:58 वाजता 
चंद्रास्त - मध्यरात्र उलटून 2 वाजता 
चंद्र रास- मीन 

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त– 07:13 पासुन 07:54 पर्यंत, 07:54 पासुन 08:36 पर्यंत
कुलिक– 07:54 पासुन 08:36 पर्यंत
कंटक– 12:03 पासुन 12:44 पर्यंत
राहु काळ– 09:48 पासुन 11:06 पर्यंत
कालवेला/अर्द्धयाम– 13:26 पासुन 14:07 पर्यंत
यमघण्ट– 14:48 पासुन 15:30 पर्यंत
यमगण्ड– 13:41 पासुन 14:59 पर्यंत
गुलिक काळ– 13:41 पासुन 14:59 पर्यंत

शुभ काळ 

अभिजीत मुहूर्त - 12:03 पासुन 12:44 पर्यंत
विजय मुहूर्त - दुपारी 02:08 ते दुपारी 02:49 

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)