Thursday Panchang : आज मार्गशीर्ष गुरुवारचं पहिलं व्रतासह विनायक चतुर्थी आणि वृद्धि योग! 'या' शुभ मुहूर्तावर करा घटस्थापना

5 December 2024 Panchang : आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिलं गुरुवारचं व्रत आहे. त्यासोबत आज विनायक चतुर्थी आणि वृद्धि योगाचा शुभ संयोग जुळून आलाय. 

नेहा चौधरी | Updated: Dec 5, 2024, 12:11 AM IST
Thursday Panchang : आज मार्गशीर्ष गुरुवारचं पहिलं व्रतासह विनायक चतुर्थी आणि वृद्धि योग! 'या' शुभ मुहूर्तावर करा घटस्थापना title=

Panchang 5 December 2024 in marathi : हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला अतिशय महत्त्व आहे. आज मार्गशीर्ष गुरुवारचं पहिलं व्रत आहे. आज घटस्थापना करुन वैभव लक्ष्मीचं व्रत केलं जातं. यंदा पहिल्याच मार्गशीर्ष गुरुवार व्रताला विनायक चतुर्थी योग जुळून आला आहे.

पंचांगानुसार, मार्गशीर्ष पूजेचा शुभ मुहूर्त 5 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11:09 ते दुपारी 12:49 पर्यंत असेल. यावेळी वैभव लक्ष्मी घटस्थापना आणि श्रीगणेशाच्या पूजेचा एकूण कालावधी 1 तास 40 मिनिटं असणार आहे.

पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी असून आज वृद्धी योग, रवियोग आणि उत्तराषाध नक्षत्राचा शुभ योग जुळून आला आहे. चंद्र मकर राशीत आहे. (thursday Panchang )  

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. गुरुवार हा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे. त्यामुळे आज विष्णू अवतार श्री स्वामी समर्थ, साईबाबा, गजानन महाजान यांची पूजा केली जाणार आहे. अशा या गुरुवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (thursday panchang 5 december 2024 panchang in marathi Vinayak Chaturthi 2024 Margashirsha Guruvar Vrat ) 

पंचांग खास मराठीत! (5 December 2024 panchang marathi)

वार - गुरुवार 
तिथी - चतुर्थी - 12:51:44 पर्यंत
नक्षत्र - उत्तराषाढ़ा - 17:27:20 पर्यंत
करण - विष्टि - 12:51:44 पर्यंत, भाव - 24:33:24 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - वृद्वि - 12:27:23 पर्यंत

सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - 06:59:46
सूर्यास्त - 17:24:00
चंद्र रास - मकर
चंद्रोदय - 10:35:00
चंद्रास्त - 21:06:00
ऋतु - हेमंत

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 10:24:14
महिना अमंत - मार्गशीर्ष
महिना पूर्णिमंत - मार्गशीर्ष

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त - 10:27:50 पासुन 11:09:27 पर्यंत, 14:37:32 पासुन 15:19:09 पर्यंत
कुलिक – 10:27:50 पासुन 11:09:27 पर्यंत
कंटक – 14:37:32 पासुन 15:19:09 पर्यंत
राहु काळ – 13:29:55 पासुन 14:47:57 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 16:00:46 पासुन 16:42:23 पर्यंत
यमघण्ट – 07:41:23 पासुन 08:22:59 पर्यंत
यमगण्ड - 06:59:46 पासुन 08:17:47 पर्यंत
गुलिक काळ – 09:35:49 पासुन 10:53:51 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - 11:51:04 पासुन 12:32:41 पर्यंत

दिशा शूळ

दक्षिण

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती

चंद्रबल  

मेष, कर्क, सिंह, वृश्चिक, मकर, मीन

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)