Surya -Mangal Yuti : 50 वर्षांनंतर मकर राशीत सूर्य व मंगळाचा संयोग; 'या' राशींच्या लोकांना धनवृद्धीसह लाभच लाभ!

Surya and Mangal Conjunction : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीमध्ये सूर्य आणि मंगळाचा युती होणार आहे. या युतीमुळे 3 राशीच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: Dec 10, 2023, 05:22 PM IST
Surya -Mangal Yuti : 50 वर्षांनंतर मकर राशीत सूर्य व मंगळाचा संयोग; 'या' राशींच्या लोकांना धनवृद्धीसह लाभच लाभ! title=
Surya Mangal Yuti Conjunction of Sun and Mars in Capricorn after 50 years this zodiac sign will benefit with the increase in wealth

Surya -Mangal Yuti : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह आपल्या ठराविक वेळेला राशी बदल करतो. या ग्रहांचा राशी बदलातून कुठल्या ना कुठल्या राशीत दोन किंवा त्याहून अधिक ग्रहांचं मिलन होतं. या ग्रहांच्या युतीमुळे मानवी जीवन आणि जगावर पडतो. लवकरच सूर्य गोचर होणार आहे. नवीन वर्षात सूर्य आणि मंगळ यांची मकर राशीत युती होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात सूर्य मंगळाचं मिलन 2024 मध्ये अमाप संपत्ती देणार आहे. (Surya Mangal Yuti Conjunction of Sun and Mars in Capricorn after 50 years this zodiac sign will benefit with the increase in wealth)

मेष रास (Aries Zodiac) 

सूर्य आणि मंगळाचा संयोग या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आङे. तुमच्या राशीच्या कर्म स्थानी हा संयोग जुळून आला आहे. करिअर आणि व्यवसायात तुमची प्रगती होणार आहे. नोकरदार आणि व्यावसायिकांना मंगळ आणि सूर्य संयोग तुम्हाला लाभदायक ठरणार आहे. तुमच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. जमीन खरेदीसाठी हा शुभ काळ आहे. व्यावसायिकांना चांगला फायदा होणार आहे. तुमच्या व्यवसायाचा विस्तार होणार आहे. 2024 हे वर्ष तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे. विद्यार्थी आणि शैक्षणिक क्षेत्रातील लोकांना या संयोग सकारात्मक परिणाम घेऊन येणार आहे. सरकारी नोकरी करणाऱ्यांना चांगली बातमी मिळणार आहे. 

वृषभ रास (Taurus Zodiac) 

सूर्य आणि मंगळाच्या संयोग तुमच्यासाठी अच्छे दिन घेऊन येणार आहे. हा संयोग तुमच्या राशीच्या नवव्या भावात निर्माण होणार आहे. नशीब तुम्हाला साथ देणार असून तुमच्या मान सन्मान वाढणार आहे. नवीन वर्षात बचत करण्यात तुम्ही यशस्वी होणार आहे. तुमचं बँक बॅलन्स घसघशीत वाढ होणार आहे. कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यात तुम्ही सहभागी होणार आहे. कामानिमित्त तुमचा प्रवास घडणार आहे. 

हेसुद्धा वाचा - साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (11 ते 17 डिसेंबर 2023) : 'या' आठवड्यात कोणावर सूर्यदेवाची कृपा? बुधादित्य व राज लक्षण राजयोग करणार संकट दूर

धनु रास (Sagittarius Zodiac)

 

मंगळ आणि सूर्याची जोड तुमच्यासाठी अनुकूल ठरणार आहे. तुमच्या राशीच्या धन आणि वाणी स्थानी हा संयोग निर्माण होतो आहे. तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे. नवीन लोकांशी तुमची ओळख होणार आहे. तुमच्या सामाजिक वर्तुळात विस्तार वाढणारल आहे. करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी मिळणार आहे. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. तुमच्या वाणीने तुम्ही लोकांचं मन जिंकणार आहात. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)