Surya Nakshatra Parivartan 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा सूर्य राशीबदल्याप्रमाणे (Sun Nakshatra Transit) नक्षत्र बदलणार आहे. पंचांगानुसार सूर्यदेव आज मघा नक्षत्रातून फाल्गुनी नक्षत्रात रात्री 9:44 वाजता प्रवेश (Sun Transit 2023) करणार आहे. 27 नक्षत्रांपैकी फाल्गुनीहे 10 वं नक्षत्र आहे. त्यामुळे काही लोकांच्या आयुष्यात सुख समृद्धी नांदणार आहे. (sun nakshatra transit 2023 today 31 August Sun Transit 2023 these zodiac signs get more money)
सूर्य शुक्राचे अधिपत्य असलेल्या नक्षत्रात परिवर्तन करत असल्यामुळे वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात चांगले दिवस सुरु होणार आहे. वडील मुलांच्या नात्यांमध्ये बंध मजबूत होणार असून त्यांच्यातील नात्यात गोडवा वाढणार आहे. या राशीच्या करिअरमध्ये ही सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. तुम्ही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ सर्वात उत्तम आहे. तुम्हाला या दिवसांमध्ये अनेक फायदे होणार आहेत.
या राशीच्या लोकांना सूर्याच्या या संक्रमणामुळे अच्छे दिन सुरु होणार आहे. हा काळ त्यांच्यासाठी वरदान ठरणार आहे. नवीन कामातून प्रगती आणि यश तुम्हाला लाभणार आहे. तुम्हाला आर्थिक फायदा या काळात होणार आहे. व्यावसायिकांसाठी देखील हा काळ यशाचा असणार आहे. अनेक मार्गांनी या लोकांना धनलाभ होमार आहे. ज्या कामात हात घालात त्यात यशस्वी होणार आहात.
कर्क राशीच्या लोकांच्या जीवनात आनंदाचे दिवस सुरु होणार आहे. स्पर्धात्मक परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचं फळं मिळणार आहे. हा काळ या राशीच्या लोकांसाठी सोनेरी दिवस घेऊन आला आहे. आतापर्यंत जी मेहनत तुम्ही केली आहे त्याचं फळ तुम्हाला प्राप्त होणार आहे. पण या काळात क्रोधावर नियंत्रण ठेवा.
या राशीच्या लोकांसाठी हा काळ वरदानापेक्षा कमी नाही. त्यांना सूर्य गोचरमुळे अनेक फायदे होणार आहेत. व्यवसायात यश प्राप्त होणार आहे. नशिबाची साथ तुम्हाला लाभणार आहे. समाजात तुमचं नाव होणार आहे. कार्यक्षेत्रात महत्त्वाची जबाबदारी मिळणार असून तुम्ही काही तरी नवीन करणार आहात. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचं कौतुक होणार आहे. व्यावसायिकांसाठी हा काळ मोठा नफा घेऊन आला आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)