मेष - आज नोकरीत बढतीची शक्यता आहे. प्रपोज करण्यासाठी दिवस चांगला आहे. परंतु विचार करूनच हे काम करा. जुनी दुखणी वर येऊ शकतात. ऑफिसमध्ये काही लोक एखादी माहिती लपवण्याचा प्रयत्न करू शकतात. बचत किंवा गुंतवणूकीच्या योजना आखू शकता. काही विचार केलेली कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागेल.
वृषभ - व्यवसायासाठी दिवस चांगला आहे. काही नवीन लोकांशी ओळखी होऊ शकतात. काम सावधानीने पूर्ण करा. कुटुंबीयांसोबत नातेसंबंध अधिक मजबूत होऊ शकतात. वाहन सुख मिळण्याचा योग आहे. नोकरीसाठी प्रयत्न करू शकता. पैशांसंबंधी सर्व व्यवहार काळजीपूर्वक करा. खर्च वाढण्याची शक्यता आहे.
मिथुन - नोकरी, व्यवसायातील निर्णय भावानिक होऊन घेऊ नका. अविवाहितांसाठी दिवस चांगला आहे. साथीदाराकडून प्रेम, सुख मिळेल. धनलाभ आणि नशिबाच्या बाबतीत दिवस बरा आहे. व्यवसायात जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. वाहन काळजीपूर्वक चालवा. अपघाताची शक्यता आहे.
कर्क - नोकरी, व्यवसायात कुटुंबीयांची साथ मिळेल. ऑफिसमध्ये बोलण्यावर नियंत्रण ठेवा. तुमच्या भावनांचा सन्मान होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या. पाय, डोकेदुखी होऊ शकते. कोणत्याही कामात घाई करू नका. सावधगिरी बाळगा. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. काम पूर्ण होता होता थांबूही शकतात.
सिंह - बेरोजगारांसाठी दिवस बरा आहे. व्यवसायात यश मिळेल. कोणताही मोठा निर्णय भावूक होऊन घेऊ नका. आयुष्यात काही मोठे बदल होऊ शकतात. नवीन नोकरी अथवा प्रमोशन होऊ शकते. नवीन कामाची सुरूवात होऊ शकते. काही महत्त्वाच्या समस्या सोडवल्या जाऊ शकतात. वायफळ खर्च वाढू शकतो. काही लोकांचा उगाचच राग केल्याने तुमचे संबंध बिघडू शकतात.
कन्या - कोणाशीतरी वाद होऊ शकतो. अचानक पैसे खर्च होऊ शकतात. राहिलेले पैसे मिळण्यासाठी वेळ लागू शकतो. रोजच्या कामात काही बदल करावे लागू शकतात. सुखकारक गोष्टींवर खर्च कराल. आळस करू नका.
तुळ - कर्जमुक्त होऊ शकता. आपल्या कामावर पूर्ण लक्ष द्या. मोठ्या लोकांकडून मदत मिळू शकते. काम सहजरित्या पूर्ण होऊ शकते. दिवसभर व्यस्त राहाल. येणाऱ्या काही दिवसांत यश मिळण्याची शक्यता आहे. थकवा आणि झोप पू्र्ण न झाल्याने त्रास होऊ शकतो.
वृश्चिक - कामात अडचणी येऊ शकतात. कोणत्याही कामाचा अतिरेक करू नका. मेहनतीचे हवे तसे फळ मिळणार नाही. नोकरदारांनी सावधानीपूर्वक काम करा. व्यवसायात तणाव वाढू शकतो. सांभाळून राहा. तब्येतीची काळजी घ्या.
धनु - नवीन व्यवसायाची योजना आखू शकता. नोकरीत बदलीचाही योग आहे. काम सावधगिरीने करा नाहीतर समस्या वाढू शकते. नोकरी किंवा कामानिमित्त मोठ्या लोकांशी अर्थपूर्ण चर्चा होऊ शकते. नशीबाची साथ मिळेल. तब्येतीत सुधारणा होईल. जुने आजार बरे होऊ शकतात.
मकर - साथीदाराकडून सरप्राइज मिळू शकते. साथीदारासोबत दिवस चांगला जाईल. तुमचा मूडही चांगला राहील. धनलाभ होऊ शकतो. विचार केलेली कामे पूर्ण होऊ शकतात. आज पूर्ण केलेल्या कामांचा येणाऱ्या दिवसांत फायदा होऊ शकतो. मनात असलेल्या योजनांवर काम करण्यास सुरूवात करा. ऑफिसमध्ये कामाचा व्याप वाढू शकतो.
कुंभ - अचानक धनलाभ होऊ शकतो. व्यवसायात येणाऱ्या अडचणी नष्ट होतील. व्यवसायात वाढ होईल. साथीदाराची साथ मिळेल. साथीदार तुमच्या भावना ओळखू शकतो. मनात काहीतरी भिती राहील. सावध राहा. पोटासंबंधी आजार होऊ शकतात. जुने आजार त्रास देऊ शकतात.
मीन - अर्धवट कामे पूर्ण होऊ शकतात. सावध राहा. वाद होऊ शकतात. खर्च वाढू शकतात. स्वत:ला सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करा. आत्मविश्वास ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. मनातली गोष्ट साथीदारापासून लपवू नका.