Shani Margi 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा सर्वात महत्त्वाचा ग्रह मानला जातो. तो न्यायदेवाता किंवा कर्माचा दाता असतो. तो लोकांना त्याच्या कर्मानुसार फळ देतो. शनी हा सर्वात संथ गतीने भ्रमण करत असतो. तो एका राशीत अडीच वर्ष राहतो. यावेळी शनि मूळ त्रिकोणी कुंभ राशीत असून 30 वर्षांनंतर शनीचे कुंभ राशीत भ्रमण झालं आहे. यासोबतच शनि लवकरच प्रतिगामी वाटचाल करणार आहे. 4 नोव्हेंबर 2023 पासून शनि प्रतिगामी होणार आहे. शनीच्या थेट हालचालीमुळे 3 राशीच्या लोकांच्या आयुष्यात मोठं बदल घडणार आहेत. या लोकांना प्रत्यक्ष शनि अनेक लाभ देणार आहे. या लोकांना शनि धनासोबत खूप प्रगती आणि यश बहाल करणार आहे. (shani margi 2023 in kumbh will give back to back success and wealth to 3 zodiac signs till november 4 )
शनीच्या प्रत्यक्ष हालचालीमुळे वृषभ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढणार आहे. या लोकांना प्रत्येक कामात यश प्राप्त होणार आहे. आत्तापर्यंत केलेल्या परिश्रमाचे शेवटी सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. नोकरीत नवीन संधी उपलब्ध होणार आहे. ही नवीन नोकरी तुम्हाला मोठे पद आणि भरपूर पैसा घेऊन येणार आहे. व्यवसायात लाभ होणार आहे. जीवनात सुख-समृद्धी नांदणार आहे. तुमच्या आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा होणार आहे.
शनि मार्गी कर्क राशीच्या लोकांच्या जीवनाची शुभ सुरुवात होणार आहे. शनिदेव करिअरमध्ये प्रगती घेऊन येणार आहे. पुढे जाण्याच्या नवीन संधी तुम्हाला मिळणार आहेत. तुमच्या मेहनतीला भरपूर यश प्राप्त होईल. तुमची उत्तरोत्तर प्रगती होणार असल्याने मनं प्रसन्न आणि समाधानी असणार आहे. मित्रपरिवाराचं सहकार्य लाभणार आहे. त्यामुळे तुम्हाला शांती आणि आनंद मिळणार आहे. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ शनिदेव देणार आहे.
शनीच्या मार्गाने कन्या राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होणार आहेत. तुम्हाला कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभणार आहे. त्यामुळे तुम्हाला एकामागून एक यश प्राप्त होईल. व्यावसायिक जीवन खूप चांगले असणार आहे. आर्थिक लाभ होणार असल्याने तुमच्या बँकेत अकाऊंटमध्ये पैसाच पैसा असणार आहे. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना यश मिळणार आहे. कुटुंबात शांतता आणि आनंदी वातावरण असणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)