Shani Gochar Makar Rashi 2022: शनिदेवांना ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्व आहे. शनिदेवांना न्यायदेवता संबोधलं जातं. शनिदेव जातकाला त्यांच्या कर्मानुसार फळं देतात. शनिदेव सध्या कुंभ राशीत असून वक्री स्थितीत आहे. शनिदेव आता मकर राशीत प्रवेश करेल. उद्या म्हणजेच 12 जुलै 2022 रोजी मकर राशीतील संक्रमणाचा सर्व 12 राशींवर प्रभाव पडेल. पण या पाच राशीच्या लोकांसाठी हा काळ विशेषतः त्रासदायक असू शकतो. मकर राशीत शनिचे संक्रमण होताच साडेसाती आणि अडीचकी सुरू होईल. ही स्थिती जानेवारी 2023 पर्यंत राहील कारण तोपर्यंत शनिदेव मकर राशीत राहणार आहे.
या पाच राशींवर शनिदेवांची नजर
शनिदेवांचा मकर राशीत प्रवेश होताच पाच राशींवर प्रभाव सुरु होईल. तर काही जातकांची शनिच्या साडेसातीपासून सुटका होईल. शनिचे संक्रमणामुळे धनु राशीच्या जातकांना साडेसाती सुरु होईल. यासोबतच कुंभ आणि मकर राशीच्या लोकांनाही साडेसातीच्या प्रकोपाचा सामना करावा लागेल. याशिवाय मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांना शनि अडीचकी सुरु होईल. दुसरीकडे, कर्क आणि वृश्चिक राशीची अडीचकीपासून सुटका होईल.
साडेसाती आणि अडीचकीचा कठीण काळ
शनिची साडेसाती आणि अडीचकीमुळे जातकांना खूप त्रास होतो. शनीची वाईट नजर व्यक्तीला आर्थिक, शारीरिक आणि मानसिक तिन्ही प्रकारे त्रास देते. यश मिळवण्यात अडचणी येतात. नशीब साथ देत नाही. पैशाची हानी होते, आरोग्य आणि नातेसंबंधांवर वाईट परिणाम होतात.
साडेसाती-अडीचकीपासून आराम मिळण्यासाठी उपाय
शनिदेवाच्या प्रभावापासून मुक्ती मिळवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे चांगले कर्म करणे. कोणाशीही खोटे बोलू नका, अपंग-वृद्ध-कामगारांना त्रास देऊ नका, त्यांचा अपमान करू नका. शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. शनिला तेल, काळे तीळ, उडीद, काळे कपडे यांसारख्या वस्तूंचे दान करा.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. याला ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)