'या' 5 राशींच्या व्यक्तींसाठी मोती ठरेल धोकादायक, काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात

मोती सर्व राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक असेल असं नाही...  

Updated: Dec 21, 2021, 04:40 PM IST
'या' 5 राशींच्या व्यक्तींसाठी मोती ठरेल धोकादायक, काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात title=

मुंबई : भारतीय संस्कृतीमध्ये ज्योतिषशास्त्रास अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहासाठी वेगवेगळी रत्ने आहेत. ज्योतिषशास्त्रात मोत्याला चंद्राचे रत्न मानले जाते. चंद्राप्रमाणेच मोती दिसायला सुंदर आणि दर्जेदार असतो. या रत्नाचा प्रभाव थेट मनावर आणि शरीरावर पडतो. मोत्याचा प्रभाव कधीच तीक्ष्ण नसतो, उलट त्याचा सूक्ष्म प्रभाव असतो. मोती सर्व राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक असेल नाही, काही राशीच्या व्यक्तींसाठी मोती धोकादायक ठरू शकतो. 

मोती कोणत्या राशीसाठी फायदेशीर आहे आणि कोणत्या राशीसाठी नाही? जाणून घ्या मोती कोणत्या राशीच्या लोकांनी घालावा आणि कोणत्या राशीच्या लोकांनी मोती घालू नये. मोती घातल्याने मत शांत राहतं. त्यामुळे तणाव काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते.

एवढंच नाही तर मोती घातल्याने आर्थिक लाभ देखील होतो. मेष, कर्क, वृश्चिक आणि मीन या राशीच्या व्यक्तींनी मोती घालण्यास सुरूवात केली, तर त्यांना मोठा फायदा होवू शकतो. 

ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ ,मिथुन ,कन्या ,मकर आणि कुंभ या राशीच्या वक्तींनी मोती घालू नये. या राशींपैकी ज्या व्यक्तींचं लग्न ठरलं आहे, त्यांनी मोती धोकादायक ठरू शकतो. 

तर दुसरीकडे सिंह, तूळ आणि धनु राशीचे लोक विशेष परिस्थितीत ज्योतिषांच्या सल्ल्याने मोती घालू शकतात. याशिवाय अतिशय भावुक किंवा रागीट स्वभावाच्या लोकांनी मोती घालू नये.