Numerology 2024 : नव्या वर्षात 'या' मूलांकाच्या लोकांनी घ्यावी विशेष काळजी, अन्यथा...

Numerology 2024 : नवीन वर्ष 2024 हे अंकशास्त्रानुसार कोणत्या मूलांकांबाबत संकटाचं आहे, याबद्दल जाणून घेणार आहोत. 

नेहा चौधरी | Updated: Dec 26, 2023, 09:05 AM IST
Numerology 2024 : नव्या वर्षात 'या' मूलांकाच्या लोकांनी घ्यावी विशेष काळजी, अन्यथा... title=
Numerology 2024 In the new year this number people will have to be careful care otherwise

Numerology 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्रदेखील एक शास्त्र आहे. ज्यातून आपल्याला भविष्यात येणाऱ्या शुभ आणि अशुभ गोष्टींबद्दल कल्पना देते. हे एक शास्त्र आहे, ज्यावर आजही अनेक जण विश्वास ठेवतात. या शास्त्रानुसार भविष्याबद्दल फक्त भाकीत केलं जातं. ते सगळं सत्य होतं असंही नाही. पण तरीदेखील नवीन वर्ष 2024 अंकशास्त्रानुसार काही मूलांकांच्या लोकांनी विशेष काळजी घ्यायची गरज आहे. (Numerology 2024  In the new year this number people will have to be careful care otherwise)

अंक ज्योतिषशास्त्रानुसार हे वर्ष शनिचे वर्ष म्हणून मानलं गेलं आहे. कारण 2024 म्हणजे 2+2+4 = 8. याचा अर्थ 2024 हे वर्ष 8 क्रमांकानुसार येतं. 8 हा अकं अंकशास्त्रात शनिशी जोडलेला गेला आहे. हे जाणून घेऊन तुम्ही तुमचं जीवन आणखी सुखकर करु शकता. 

2024 मध्ये मूलांक क्रमांक 1 असलेल्या लोकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. ज्या लोकांचा जन्म 1, 10, 19, 28 ला झाला आहे, त्यांचा मूलांक हा 1 असतो. या वर्षी अंक 1 असलेल्या लोकांनी ऑगस्ट महिन्यात विशेष काळजी घेणे गरजेचं आहे. या महिन्यात तुम्हाला काही आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे या अंकाच्या लोकांना सतर्क राहणे आवश्यक असणार आहे. या वर्षी आरोग्याची विशेष काळजी या लोकांनी घ्यावी. वाहन चालवताना सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक असून अपघात होण्याची शक्यता आहे. 

जीवनात नवीन गोष्टी सुरू करताना तुम्ही सावधगिरी बाळगणे गरजेचं आहे. विशेषतः जेव्हा तुम्ही भागीदाराबद्दल बोलत असाल, तर नवीन वर्षात कोणत्याही भागीदारासोबत काम करण्यापूर्वी ते तुमच्यासाठी योग्य आहे आणि तुमचं आरोग्य ते सहन करू शकतं याची खात्री नक्की करु घ्या. तुमच्या वैयक्तिक आयुष्यातही सावध राहणं गरजेचं आहे. जेणेकरून तुम्ही तुमचा आत्मविश्वास आणि आनंद, शांतता टिकवून ठेवू शकता. आपलं ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करणे गरजेचं आहे. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी वचनबद्ध राहणं तुमच्या हिताच ठरणार आहे. 

या वर्षी समाजसेवेचा प्रयत्न तुम्हाला शांतता देईल. तुमच्या कल्याणासाठी हात देण्याची हीच योग्य वेळ असल्याचं अंकशास्त्र अभ्यासक म्हणतात. यामुळे तुम्हाला आत्म्याचं संतुलन राखून ठेवता येईल. अंकशास्त्र सोप्या शब्दात समजणे कठीण आहे, मात्र हे एक मार्गदर्शन असू शकतं जे तुमचं जीवन अधिक यशस्वी करण्यात मदत मिळते. या वर्षी तुम्ही तुमचं ध्येय साध्य करण्यात यश मिळवण्यात यश मिळेल, मात्र सावध राहा आणि कठोर परिश्रम करा. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती अंक शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)