Numerology 2024 : अंकशास्त्रानुसार 2024 हे वर्ष कसं असणार त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. नवीन वर्षात कोणता मूलांक किंवा अंक भाग्यवान असेल? नवीन वर्ष हे शनीचं वर्ष असणार आहे. शनिची संख्या 8 आहे असल्याने अंकशास्त्रानुसार येणारं वर्ष 2024 अंक 8 चं आहे. म्हणजेच 8 वा क्रमांक असलेल्या लोकांसाठी 2024 हे वर्ष खूप शुभ सिद्ध होणार आहे. 8 अंक असलेल्या लोकांसाठी 2024 हे वर्ष कसं शुभ असणार आहे त्याशिवाय अजून काही अंकासाठी हे वर्ष 2024 लकी असणार आहे पाहूयात. (Numerology 2024 Golden Period in 2024 for people of these 4 numerology radix get money respect)
8 अंक असणाऱ्यांसाठी नवीन वर्ष लाभदायक ठरणार आहे. 2024 मध्ये 8 क्रमांकाचं लोकांसाठी सुवर्णकाळ असणार आहे. 2024 हे वर्ष तुमच्यासाठी जुन्या समस्यांमधून बाहेर पडण्याचे वर्ष असणार आहे. तसंच, या वर्षी तुम्ही इतरांना त्यांच्या समस्यांमधून मदत करणार आहे. 5, 6 आणि 7 क्रमांक असलेल्यांना मदत करण्यासाठी तुम्ही नेहमी तयार असणार आहे.
7 अंक असणाऱ्यांसाठी 2024 हे वर्ष शुभ असणार आहे. 2024 मध्ये तुमचं आरोग्य सामान्य नसणार आहे. तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. पण 2024 मध्ये तुम्हाला एकटं वाटणार नाहीय. अनेक लोक तुमच्या मदतीला येणार आहे. 7 व्या क्रमांकाचे लोक 2024 मध्ये चांगले पैसे कमावणार आहे. तुमची उर्जा पातळी खूप मजबूत असणार आहे. या वर्षी तुम्हीला धार्मिक कार्यात रस निर्माण होणार आहे. या वर्षी तुम्ही प्रवास देखील करणार आहात. 7 क्रमांकाच्या लोकांचा मित्र क्रमांक 8 असल्यायाने या वर्षी तुम्हाला 8 क्रमांकाच्या लोकांची साथ मिळणार आहे.
2024 हे वर्ष 6 क्रमांकाच्या लोकांसाठी चांगले ठरणार आहे. तुम्ही 2024 मध्ये मालमत्ता उभी करणार आहात. तुम्ही तुमचं पैसे कोणत्याही स्थिर मालमत्तेत गुंतवणूक करुन नफा मिळवणार आहे. या वर्षी तुम्ही सोने, कार किंवा इतर कोणतीही महागडी वस्तू खरेदी करण्याचे योग आहेत. तुमचं आरोग्य सामान्य राहणार आहे.
5 क्रमांकाच्या लोकांसाठी हे वर्ष चांगले असणार आहे. नवीन वर्षात तुम्ही प्रवास करणार आहात. या वर्षी तुम्ही परदेशातही जाण्याचे योग आहेत. 2024 मध्ये तुमचा प्रत्येक महिना पूर्वीपेक्षा चांगला असणार आहे. तुमचं प्रेम जीवन देखील या वर्षी चांगले असणार आहे. जे अविवाहित आहेत त्यांनाही जीवनसाथी मिळणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती अंक शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)