Matsya Rajyog 2023 : निचभंग, मत्स्य आणि विष्णू राजयोगातून 'या' राशींना यश-प्रमोशन-प्रतिष्ठा

Neechbhang Vishnu and Matsya Rajyog 2023 : मंगळ राशीचं परिवर्तनामुळे तीन खास योग तयार होत आहेत. लवकरच मंगळ आपली स्थिती बदलणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: Jun 16, 2023, 03:29 PM IST
Matsya Rajyog 2023 : निचभंग, मत्स्य आणि विष्णू राजयोगातून 'या' राशींना यश-प्रमोशन-प्रतिष्ठा title=
neechbhang rajyog matsya rajyoga vishnu yoga mars transit Mangal Gochar 2023 zodiac get promotion success money

NeechBhang Vishnu and Matsya Rajyog 2023 : ग्रह गोचरमुळे आपल्या कुंडलीत विशेष राजयोग तयार होतात. या राजयोगामुळे काही राशींचं नशिब रातोरात पलटतं. 1 जुलैला मंगळ सिंह राशीत (Mangal Gochar 2023) प्रवेश करणार आहे. मंगळ सिंह राशीत 17 ऑगस्टपर्यंत स्थानबद्ध असणार आहे. या मंगळ गोचरमुळे 3 राजयोग निर्माण होत आहे. हे राजयोग 3 राशीच्या लोकांसाठी खूप भाग्यशाली ठरणार आहे.  (mars transit)

मंगळ गोचरमुळे कुंडलीत निचभंग राजयोग, मत्स्ययोग आणि विष्णूयोग तयार होतो आहे. वैदिक राजयोगामुळे कुंडलीत उच्च ग्रहासोबत दुर्बल ग्रह असल्यास नीच भांग राजयोग तयार होतो. तर तुमच्या कुंडलीच्या आरोही आणि नवव्या घरात शुभ ग्रह असणे गरजेचं आहे. शिवाय पाचव्या घरात शुभ आणि अशुभ ग्रह असायला हवेत. तर चौथ्या आणि आठव्या घरात अशुभ ग्रहांची उपस्थिती अनिवार्य आहे. अशी पूर्ण स्थिती तयार झाली तरच मत्स्ययोग तयार होतो. तर विष्णुयोगासाठी नवमेशाचा स्वामी जेव्हा नवव्या घरात असतो आणि दहाव्या घराचा स्वामी नवव्या घरात असतो तेव्हा हा योग तयार होतो. (neechbhang rajyog matsya rajyoga vishnu yoga mars transit Mangal Gochar 2023 zodiac get promotion success money)

'या' राशींवर दिसणार सकारात्मक परिणाम 

मिथुन (Gemini)

मिथुन राशीच्या लोकांसाठी मंगळ गोचर अतिशय शुभ मानलं जातं. 1 जुलैला मंगळ कुंडलीत तिसऱ्या घरात असणार आहे. तिसतं घर हे धैर्य आणि शौर्य प्रतिक मानलं जातं. त्यानुसार या राशीच्या लोकांना धनलाभाचे योग आहेत. मालमत्तेसंदर्भात तुम्हाला लाभ मिळणार आहे. या काळात तुम्ही शत्रूवर मात करण्यात यश मिळणार आहे. 

धनु (Sagittarius)

या राशीच्या लोकांच्या कुंडलीत पाचव्या आणि बाराव्या भावाचा स्वामी हा मंगळ आहे. त्यामुळे मंगळ ग्रहच्या गोचरमुळे तुम्हाला धार्मिक यात्रेचे योग आहेत. परदेशाशी संबंधित लोकांना धनलाभाचे योग आहेत. व्यवसायातून नवीन करार होणार. जुन्या कुठला मालमत्तेचा वाद सुरु असेल तर तो मार्गी लागेल. वाहून आणि वास्तू खरेदीचे योग आहेत. 

मीन (Pisces)

मीन राशीच्या लोकांनासाठी मंगळ गोचर शुभ ठरणार आहे. कुंडलीतील द्वितीय आणि भाग्य घराचा स्वामी हा मंगळ असून तो कुंडलीतील सहाव्या घरात प्रवेश करणार आहे. त्यामुळे तुमच्या प्रमोशनचे योग आहेत. कामानिमित्त प्रवासाचे योग जुळून आले आहेत. शत्रूंचा पराभव करण्यात तुम्हाला यश मिळणार आहे. समाजात मान सन्मान वाढणार आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)