Budh Chandra Gochar 2023 in Taurus : बुध-चंद्र युतीमुळे काही राशींच्या लोकांना लाभ होण्याची शक्यता आहे. बुध आणि चंद्र हे वृषभ राशीत आल्याने चांगला योग आहे. ज्योतिषशास्त्रानुसार बुध सध्या वृषभ राशीत आहे आणि आता चंद्रानेही या राशीत प्रवेश केला आहे. वृषभ राशीमध्ये तयार झालेला बुध आणि चंद्राचा युतीमुळे काही लोकांना खूप लाभ होणार आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार 7 जून रोजी बुध ग्रह संक्रमणानंतर वृषभ राशीत प्रवेश केला आहे. आता 1 जुलैपर्यंत बुध वृषभ राशीत राहील. वृषभ राशीत बुधाच्या गोचरमुळे बुधादित्य योग तयार झाला होता, परंतु 15 जून रोजी सूर्य मिथुन राशीत प्रवेश करताच हा राजयोग संपला. 7 दिवस वृषभ राशीत बनवलेल्या या बुधादित्य राजयोगाने अनेकांना जोरदार लाभ दिला. मात्र आता सूर्याने वृषभ राशी सोडताच चंद्राने वृषभ राशीत प्रवेश केला आहे.
15 जूनच्या रात्री 8.23 वाजता वृषभ राशीत चंद्र गोचरमुळे बुध आणि चंद्राची युती झाली आहे. शुक्राच्या राशीत चंद्राचा प्रवेश वृषभ राशीत सुख-समृद्धी देईल. यासोबतच शुक्राच्या राशीमध्ये बुध ग्रहाची उपस्थिती देखील भरपूर लाभ देईल. वृषभ राशीमध्ये बुध आणि चंद्राच्या युतीमुले कोणत्या राशींना लाभ होऊ शकतो हे जाणून घ्या.
वृषभ :
बुध आणि चंद्र युतीने या राशींच्या लोकांना अच्छे दिन पाहायला मिळणार आहेत. वृषभ राशीमध्ये बुध आणि चंद्राची युती या राशींच्या लोकांना खूप लाभ देईल. या लोकांच्या हाती अचानक खूप पैसा येऊ शकतो. तुमच्या आर्थिक स्थितीत तेजी येऊ शकते. बढतीची चांगली बातमी मिळू शकते. नवीन नोकरीचा शोध संपेल. तुम्हाला मोठी ऑफर मिळू शकते. तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही मोठे काम कराल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.
कन्या :
बुध आणि चंद्र युतीमुळे कन्या राशीच्या लोकांना मोठा लाभ होणार आहे. धनलाभ होईल आणि बचत करण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. नोकरी-व्यवसायात अपेक्षित प्रगती मिळाल्याने तुम्हाला खूप आनंद होईल. नवीन व्यवसाय किंवा प्रकल्प सुरु करु शकता.
मकर:
बुध आणि चंद्र युतीने या राशीच्या लोकांना मोठा आर्थिक लाभ होणार आहे. चंद्र आणि बुध यांच्या युतीमुळे चंद्राच्या संक्रमणामुळे मकर राशीच्या लोकांना अनेक प्रकारे फायदा होईल. व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो किंवा विस्ताराशी संबंधित कोणतीही योजना यशस्वी होऊ शकते. धनलाभ होईल. आर्थिक समस्या दूर होतील. गुंतवणुकीतून लाभ होईल. या लोकांचा अध्यात्माकडे कल वाढू शकतो.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)