Surya Grahan 2023 / Navratri 2023 : सूर्यग्रहण ही खगोलीय घटना असली तरी वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहणाला विशेष महत्त्व आहे. या वर्षातील शेवटचं आणि दुसरं सूर्यग्रहण येत्या 14 ऑक्टोबरला असणार आहे. ते भारतात दिसणार नाही आहे. पण या सूर्यग्रहणाचा परिणाम 12 राशींवर दिसून येणार आहे, असं ज्योतिषशास्त्र अभ्यास यांचं म्हणं आहे. (navratri will start under the shadow of solar eclipse surya grahan these zodiac signs will suffer big losse)
हिंदू धर्मात नवरात्रीचा सण सर्वात खास मानला जातो. नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या या पवित्र उत्सवात दुर्गा मातेच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. सूर्यग्रहणाच्या अगदी दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 ऑक्टोबरपासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे. सूर्यग्रहण रात्री 2.25 वाजता संपणार आहे. त्यानंतर शुभ कार्य करण्यास काही हरकत नाही. पण नवरात्रीत सूर्यग्रहणाचा परिणाम राशींवर होणार आहे. 5 राशींच्या लोकांवर मोठं संकट कोसळणार आहे.
सूर्यग्रहणामुळे या राशींच्या लोकांवर नकारात्मक प्रभाव पडणार असून यांचे मन अस्वस्थ राहणार आहे. या लोकांना मानसिक आजारपणाचा सामना करावा लागणार आहे. आर्थिक तंगी जाणवणार असून आर्थिक स्थिती ढासळणार आहे. या काळात तुम्ही वाणीवर नियंत्रण ठेवा. तुमचा आत्मविश्वासही डगमगणार आहे.
या राशीच्या लोकांना सूर्यग्रहणामुळे मोठे नुकसान सहन करावं लागणार आहे. तुमच्यामध्ये या काळात आत्मविश्वासात कमी जाणविणार आहे. त्यामुळे केलेले काम देखील बिघणार आहे. तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा, अन्यथा तुमच्या जवळच्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होईल. या काळात रागावर नियंत्रण ठेवा.
या राशीच्या लोकांवर सूर्यग्रहणाचा भयानक प्रभाव पडणार आहे. या काळात तुम्हाला कामाच्या ठिकाणी सतर्क आणि सावध राहवं लागणार आहे. जमिनीच्या वादात तुम्हाला कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागणार आहे. जीवनात चढ-उतार येणार आहे. जर तुम्ही शेअर बाजारात पैसे गुंतवले असेल तर तुमचे खूप मोठे नुकसान होणार आहे.
या राशीच्या लोकांना सूर्यग्रहणाचे अशुभ परिणामाला तोंड द्यावे लागणार आहे. या काळात तुमच्या मनात चढ-उतारांची स्थिती निर्माण होणार आहे. कुटुंब, मित्र किंवा जोडीदाराशी भांडण होऊ शकतं. ज्यामुळे नात्यात तणाव निर्माण होणार आहे. क्रोध आणि रागावर या काळात नियंत्रण ठेवावा लागणार आहे. व्यवसायासाठी हा काळ अतिशय वाईट ठरणार आहे.
या राशीसाठी सूर्यग्रहण खूप त्रासदायक ठरणार आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास कमी होणार आहे. रागावर नियंत्रण ठेवा. आरोग्याकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे. मुलांकडून वाईट बातमी मिळणार आहे. आर्थिक संकटातून जावं लागणार आहे. व्यापार-व्यवसायात मोठं नुकसान होण्याची भीती आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)