Navratri 2023 : नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणत्या रंगाला आहे महत्त्व? देवीला नऊ माळा कोणत्या?

Navratri 2023 :  नवरात्रीत नऊ देवीच्या पूजेसोबत नऊ रंग आणि घटस्ठापनेच्या वेळी नऊ माळा याला महत्त्व आहे. चला मग जाऊन घेऊयात नऊ रंग आणि नऊ माळा कोणत्या आहेत त्या. 

नेहा चौधरी | Updated: Oct 9, 2023, 09:24 PM IST
Navratri 2023 : नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणत्या रंगाला आहे महत्त्व? देवीला नऊ माळा कोणत्या? title=
navratri 2023 nine colors and devi name and offer nine flower garland to devi ghatsthapana in marathi

Navratri 2023 : हिंदू पंचांगानुसार आश्विन शुक्ल पक्षातील प्रतिपदेला माता देवीचं आगमन होतं. महाराष्ट्रात घरोघरी घटस्थापना केली जाते. प्रतिपदेपासून विजयादशमीपर्यंत देवींच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. यंदा नवरात्री सूर्यग्रहण आणि सर्वपित्री अमावस्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. तर 23 ऑक्टोबरपर्यंत नवरात्रीचा उत्साह असणार आहे.  या नऊ दिवसात घटस्थापनेसह गरबा दांडियाचा उत्साह नऊ दिवस रंगतो. या नऊ दिवसात नऊ रंगांचे कपडे परिधान केले जाता. (navratri 2023 nine colors and devi name and offer nine flower garland to devi ghatsthapana in marathi )

खरं तर या रंगांमागे धार्मिक कारणं नाही, पंचागकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितलं आहे. पण पौराणिक ग्रंथामध्ये प्रत्येक वार जसा एका देवाला समर्पित असतो. तसाच प्रत्येक वाराला एक विशिष्ट रंग समर्पित केला आहे. त्यानंतर या नऊ दिवसांचे रंग ठरले जातात. गेल्या काही वर्षांमध्ये हे नऊ रंग फ्लो करण्याचा नवीन ट्रेंड आला आहे. लोकल ट्रेन असो ऑफिस असो किंवा कॉलेज नवरात्रीमधील नऊ रंग मोठ्या उत्साहाने एका रंगात रंगलेले दिसतात. या ट्रेंडमुळे एकता दिसून येते शिवाय प्रत्येक जण एका रंगात रंगलेला दिसतो. 

नवरात्री 2023 नऊ रंग आणि देवीची नावं 

प्रतिपदा- 15 ऑक्टोबर 

रविवार -  नवदुर्गा - केशरी, हा रंग सकारात्मक आणि उत्साहाचं प्रतीक आहे. 

द्वितीया- 16 ऑक्टोबर

सोमवार - शैलपुत्री - पांढरा रंग, हा शुद्धता आणि पावित्र्याचं प्रतीक मानलं जातं. 

तृतीया – 17 ऑक्टोबर

मंगळवार - ब्रह्मचारिणी देवी - लाल, हा रंग शुभ संकेत आणि ऊर्जेचे प्रतीक मानलं जातं. 

चतुर्थी – 18 ऑक्टोबर 

बुधवार - चंद्रघंटा देवी - निळा, हा रंग विशालता, विश्वास, श्रद्धा, आत्मियया यांचं प्रतीक मानलं जातं. 

पंचमी – 19 ऑक्टोबर

गुरुवार - कृष्मांडा देवी - पिवळा, हा रंग प्रखरता, तेज आणि नव्या गोष्टीची सुरुवात म्हणून पाहिलं जातं. 

षष्ठी – 20 ऑक्टोबर

शुक्रवार - स्कंदमाता - हिरवा, हा रंग निसर्गाचे आणि मायेचे प्रतीक आहे. 

सप्तमी- 21 ऑक्टोबर 

शनिवारी - कात्यायनी देवी - राखाडी, हा रंग स्थिरता, अढळता आणि शिस्तबद्धतेचं प्रतीक आहे. 

अष्टमी- 22 ऑक्टोबर 

रविवार - महागौरी - जांभळा, हा रंग महत्त्वाकांक्षा, ध्येय आणि उर्जेचे प्रतीक म्हणून ओळखलं जातं. 

नवमी - 23 ऑक्टोबर 

सोमवार - सिद्धीदात्री - मोरपंखी - हा रंग वाढ आणि सुपिकतेचं प्रतीक मानलं जातं. 

आता पाहूयात घटस्थापनेला नऊ दिवस कुठली माळ असते

पहिली माळ
विडाच्या पानाची माळ असते.
 
दुसरी माळ
अनंत, मोगरा, चमेली, किंवा तगर यांसारख्या पांढऱ्या फुलांची माळ.
 
तिसरी माळ
निळी फुले, गोकर्णीच्या किंवा कृष्णकमळ फुलांच्या माळ.

चौथी माळ
केशरी अथवा भगवी फुले. अबोली, तेरडा, अशोक किंवा तिळाची फुले.
 
पाचवी माळ
बेल किंवा कुंकवाची वाहतात.
 
सहावी माळ
कर्दळीच्या फुलांची माळ.
 
सातवी माळ
झेंडू किंवा नारिंगीची फुले.
 
आठवी माळ

तांबडी फुले, कमळ, जास्वंद, कण्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ.
 
नववी माळ
कुंकुमार्चन करतात

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)