Nag Panchami 2023 Date : जून महिना संपत आला आहे. पावसाचा पत्ता नाही. मात्र, आता श्रावण महिना येत आहे. शिवभक्त श्रावण महिन्याची आतुरतेने वाट पाहतात. नागपंचमी हा सण श्रावण महिन्यात साजरा केला जातो, या दिवशी नाग देवतेची पूजा केली जाते. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला नागपंचमी साजरी केली जाते. भगवान शिव आपल्या गळ्यात नाग देवता धारण करतात. यावर्षी नागपंचमीला एक अतिशय शुभ योग घडत आहे, त्यामुळे नागदेवता आणि भगवान शिव यांची पूजा केल्यास विशेष लाभ होईल. यासोबतच जर कुंडलीत काल सर्प दोष असेल तर त्यापासून मुक्ती मिळण्याची चांगली संधी आहे.
हिंदू कॅलेंडरनुसार, श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी 21 ऑगस्टच्या मध्यरात्री 12:21 पासून सुरु होईल आणि 22 ऑगस्टच्या मध्यरात्री 2:00 वाजता संपेल. उदयतिथीनुसार नागपंचमी 21 ऑगस्ट, सोमवारी साजरी केली जाईल. सोमवार हा भगवान शंकराला समर्पित असल्याने आणि नाग हे शंकराचा भक्त असल्याने सोमवारी येणारी नागपंचमी अत्यंत शुभ मानली जात आहे. सकाळी उठल्यावर चुकनही 'या' गोष्टी पाहू नका !
नागपंचमीच्या दिवशी नागदेवता आणि भगवान शंकराची पूजा केल्याने सर्पदंश आणि अकाली मृत्यूचा धोका टळतो. यासोबतच भगवान शंकराची पूजा केल्याने ग्रह दोष दूर होतात. विशेषत: काल सर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी नागपंचमीचा दिवस सर्वोत्तम मानला जातो. नागपंचमी सोमवारी आल्याने यावेळी नागपंचमी आणखी खास बनली आहे.
साप हे संपत्तीचे रक्षक मानले गेले आहे. नागदेवतेची पूजा केल्याने भरपूर संपत्ती मिळते. नागपंचमीला सकाळी लवकर उठून स्नान करावे. तसेच भगवान शंकराचे स्मरण करा. जर तुम्ही नागपंचमीचा उपवास करत असाल तर व्रताची शपथ घ्या. यानंतर नाग आणि नागिनची प्रतिमा साकारा आणि दुधाचा अभिषेक करा. नाग प्रतिमेळा फळे, फुले, मिठाई अर्पण करा. हलका धूप दाखवा. शेवटी नागपंचमीची आरती करावी. कुंडलीत काल सर्प दोष असल्यास शिवलिंगावर चांदीच्या नागाची जोडी अर्पण करावी. यामुळे काल सर्प दोषामुळे होणाऱ्या अशुभ परिणामांपासून मुक्ती मिळण्यास मदत होते, असे ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)