Surya Gochar 2023 : सूर्य गोचरमुळे 'या' राशींच्या लोकांचं नशीब सूर्यासारखं चमकणार, तिजोरी छोटी पडले एवढा धनलाभ

Surya Gochar Effect 2023 : सूर्य ग्रह 15 जून गुरुवारी आपलं स्थिती बदलणार आहे. सूर्य गोचरमुळे काही राशींच्या नशिबात प्रचंड प्रमाणात धनलाभाचे योग आहेत. 

Updated: Jun 14, 2023, 11:56 AM IST
 Surya Gochar 2023 : सूर्य गोचरमुळे 'या' राशींच्या लोकांचं नशीब सूर्यासारखं चमकणार, तिजोरी छोटी पडले एवढा धनलाभ  title=
sun transit 2023 surya gochar Sun Transit In Mithun 15 june 2023 positive zodiac effects

Sun Transit In Mithun 15 june 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह गोचरला अतिशय महत्त्व आहे. कारण जेव्हा आपली स्थिती बदलतात तेव्हा मानवी आयुष्यावर त्याचा परिणाम होतो. ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत जेव्हा प्रवेश करतो. तेव्हा आरोग्य, धन, संपत्ती, करियर आणि वैवाहिक जीवनावर त्याचा सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम दिसतो. काही राशींसाठी तो शुभ तर काहींसाठी तो अशुभ असतो. (sun transit 2023 surya gochar Sun Transit In Mithun 15 june 2023 positive zodiac effects)

सूर्य गोचर 2023 

सूर्य गोचर 15 जून म्हणजे गुरुवारी संध्याकाळी 6.07 वाजता मिथुन राशीत होणार आहे. सूर्याच्या या संक्रमणामुळे काही राशींवर सकारात्मक परिणाम दिसणार आहे. काही राशींचं भाग्य अगदी सूर्यासारखं चमकणार आहे. 

कर्क (Cancer)

या राशीच्या लोकांना सूर्य गोचरमुळे सकारत्मक परिणाम दिसून येणार आहे. परदेश वारीचे स्वप्न पूर्ण होणार आहे. अडकलेली कामं मार्गी लागणार आहेत. परदेशाशी व्यवसाय संबंधित असेल तर आर्थिक फायदा होणार आहे. मात्र उत्पन्नापेक्षा जास्त खर्च होईल. जुन्या गुंतवणुकीतून धनलाभाचे योग आहेत. 

सिंह (Leo)

सूर्य गोचरमुळे सिंह राशीच्या लोकांना प्रचंड प्रमाणात लाभ होणार आहे. सर्व कामामध्ये यश मिळणार आहे. प्रत्येकात यश मिळणार आहे. नवीन कामाची संधी मिळणार आहे. तुमच्या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होणार आहे. आर्थिक फायदासोबत मान सन्मान वाढणार आहे. मात्र प्रेम संबंधात काळजी घ्या. 

कन्या (Virgo)

सूर्य गोचरामुळे कन्या राशीच्या लोकांच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचं नाव गाजणार आहे. चांगल्या कंपनीकडून तुम्हाला नोकरीची संधी मिळणार आहे. करिअरच्या दृष्टीकोनातून हा काळ शुभ ठरणार आहे. कुटुंबातही तुमचा सन्मान वाढणार आहे. 

मकर (Capricorn)

 सूर्य गोचरमुळे मकर राशीच्या लोकांची आर्थिक फायदा होणार आहे.  संपत्तीत वाढ होऊन तिजोरी लहान पडणार आहे.  धनसंपत्ती वाढण्याचे अनेक स्त्रोत मिळणार आहे. कर्ज काढले असतील तर तुम्ही कर्जफेड करु शकणार आहे. मात्र आरोग्याकडे लक्ष द्या. 

कुंभ (Aquarius)

सूर्याच्या संक्रमणाने या राशीचे लोकांचं करिअर चढता आलेख पाहिला मिळणार आहे.  हा काळ तुमच्यासाठी खूप भाग्यशाली ठरणार आहे. सूर्य गोचर तुमची सर्जनशीलता वाढविणारा ठरणार आहे. नवीन योजनांचा तुमच्या प्रोत्साहन मिळणार आहे. सूर्य गोचर तुमच्या व्यक्तित्वासाठी चांगला ठरणार आहे. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)