नागपंचमीला अत्यंत दुर्मिळ योग! श्रावणातील पहिला सण 'या' राशींना करणार लखपती

Nag Panchami 2023 : यंदा अधिक मास आल्यामुळे ऑगस्ट महिन्यात येणारे सणवार पुढे ढकलल्या गेले. यंदा नागपंचमी 21 ऑगस्टला असून यादिवशी दुर्मिळ योग जुळून आला आहे. 

नेहा चौधरी | Updated: Aug 14, 2023, 03:47 PM IST
नागपंचमीला अत्यंत दुर्मिळ योग! श्रावणातील पहिला सण 'या' राशींना करणार लखपती title=
nag panchami 2023 Lucky Zodiac Sign rare yog blessing money astrology news in marathi

Nag Panchami Lucky Zodiac Signs : येत्या 16 ऑगस्टला अधिक मास अमावस्या आहे. त्यानंतर अधिक मासा संपणार आहे. त्यानंतर श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. श्रावण महिन्यातील पहिला वहिला सण आणि हिंदू धर्मात विशेष महत्त्व असलेला सण म्हणजे नागपंचमी. यंदा नागपंचमी 21 ऑगस्टला साजरी करण्यात येणार आहे.  या वर्षी नागपंचमीला अतिशय दुर्मिळ असा योगायोग जुळून आला आहे. (nag panchami 2023 Lucky Zodiac Sign rare yog blessing money astrology news in marathi)

नागपंचमी दुर्मिळ योगायोग!

पंचांगानुसार नागपंचमीचा दिवस सोमवार आहे. याचा अर्थ नागपंचमीला पहिला श्रावण सोमवार आहे. त्यासोबत मुद्रा योग, शुभ योग आणि शुक्ल योग असे तीन शुभ योग जुळून आला आहे. श्रावण महिला हा भोलेनाथाचा आवडता महिना असल्याने पहिल्या श्रावण सोमवारी काही राशींवर शंकर भगवान आपला विशेष आशिर्वाद दिला आहे. 

कुंभ (Aquarius)

कुंभ राशीच्या लोकांसाठी नागपंचमी शुभ असणार आहे. या लोकांना नशिबाची साथ काय असतं ते या दिवसात अनुभूती येणार आहे. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाला बॉस आणि सहकार्यांकडून कौतुक होणार आहे.  नागपंचमीनंतर तुमच्या बँक बलेन्स वाढणार आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. 

हेसुद्धा वाचा - Sex Life : शारीरिक संबंधाबद्दल 'या' राशींची जोडपी असतात Made For Each Other!

वृश्चिक (Scorpio)

या राशीच्या लोकांवर भगवान शंकराची विशेष आशिर्वाद मिळणार आहे. घरात सुख समृद्धी वाढणार आहे. उद्योग क्षेत्रातील लोकांसाठी ही नागपंचमी सोनेरी दिवस घेऊन येणार आहे. या लोकांना मोठा लाभ होणार आहे. जोडीदारासोबत आनंदी क्षण घालवणार आहात. 

धनु (Sagittarius)

या राशीच्या लोकांसाठी नागपंचमीचा दिवश अतिशय लाभदायक ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची साथ तुम्हाला मिळणार असल्याने तुमचं मनं प्रसन्न असणारा आहे. बिझनेस करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला ठरणार असून त्यांना आर्थिक फायदा होणार आहे. वैवाहित जीवनात आनंदी आनंद वातावरण असणार आहे. 

मकर (Capricorn)

मकर राशीच्या लोकांच्या जीवनात नागपंचमीपासून समृद्धीत वाढेल. कौटुंबिक जीवनात सुख-शांतीने वातावरण बहरुन जाणार आहे.  संपत्ती आणि समृद्धीमध्ये वाढ झाल्यामुळे घरात आनंदी वातावरण असेल.

हेसुद्धा वाचा - Adhik Maas Amavasya 2023 : तब्बल 19 वर्षांनंतर अमावस्येला दुर्मिळ संयोग! 'या' आयुष्यावर बरसणार भोलेनाथाची कृपा

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)