Mars Uday 2024 : नवीन वर्ष 2024 च्या सुरुवातीला होणार मंगळाचा उदय, 'या' राशींना मालामाल होण्याची संधी

Mangal Uday 2024 : सहास आणि शौर्याचं कारक मंगळदेव नवीन वर्षात 2024 च्या सुरुवातीला उदय स्थितीत येणार आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांना मालामाल होण्याची संधी चालून आली आहे. 

नेहा चौधरी | Updated: Nov 20, 2023, 10:39 AM IST
Mars Uday 2024 : नवीन वर्ष 2024 च्या सुरुवातीला होणार मंगळाचा उदय, 'या' राशींना मालामाल होण्याची संधी title=
Mars will rise at the beginning of New Year 2024 an opportunity for these signs to get rich

Mangal Uday 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा सेनापती मंगळदेव जेव्हा जेव्हा आपली स्थिती बदलतो याचा परिणाम 12 राशींच्या लोकांवर पडतो. साहस आणि शौर्याचा कारक मंगळ नवीन वर्षात आली स्थिती बदलणार आहे. 14 जानेवारी 2024 ला मंगळाचा उदय होणार आहेत. मंगळाच्या या स्थितीमुळे काही राशींच्या लोकांना अचानक पैसा मिळणार आहे. एवढंच नाही तर त्यांच्या मालमत्तेमध्ये वाढ होणार आहे. कोणत्या राशींसाठी येणारं वर्ष धनलाभाचं आहे जाणून घ्या. (Mars will rise at the beginning of New Year 2024 an opportunity for these signs to get rich)

मेष रास (Aries Zodiac)

मंगळाचा उदय तुमच्यासाठी अनुकूल ठरणार आहे. मेष राशीचा स्वामी मंगळदेव असल्याने मंगळ तुमच्या राशीतून नवव्या घरात येणार आहे. मंगळ उदयमुळे नशिब तुमची साथ देणार आहे. तुमच्या योजनांमध्ये यश प्राप्त होणार आहे. करिअरशी संबंधित काही चांगल्या ऑफर मिळणार आहे. व्यवसायात दीर्घकाळ रखडलेली कामं पुन्हा सुरु होणार आहे. जमिनीच्या व्यवहारातून लाभ होणार आहे. 

धनु रास (Dhanu Zodiac)

मंगळाचा उदय तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. तुमच्या राशीच्या चढत्या घरात मंगळाचा उदय होतो आहे. त्यामुळे वर्ष 2023 मध्ये तुमच्या धैर्यात आणि शौर्यात वाढणार असून तुमचा आत्मविश्वास द्विगुणीत होणार आहे. विवाहितांना जोडीदाराकडून सहकार्य लाभणार आहे. तुमचं उत्पन्नही वाढणार आहे. कुटुंबासाठी तुम्ही महत्त्वाचा निर्णय घेणार आहात. मालमत्ता खरेदीचा योग आहे. 

सिंह रास (Leo Zodiac)

मंगळाचा उदय तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे. कारण मंगळ ग्रह हा तुमच्या राशीचा स्वामी सूर्य देवाचा मित्र असल्याने तुम्हाला फायदा होणार आहे. मंगळ तुमच्या राशीतून पाचव्या भावात उदयास येणार आहे. मंगळ उदयमुळे तुम्हाला मुलांकडून आनंदाची बातमी कानावर पडणार आहे. त्यांच्या लग्ना किंवा नोकरीसंदर्भात चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीत तुम्हाला अनपेक्षित नफा मिळणार आहे. तुमच्या संपत्ती आणि प्रतिष्ठेत वाढ होणार आहे.  

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )