Makar Sankranti 2024 :हिंदू धर्मात मकर संक्रांतीचा सण खूप महत्त्वाचा सण मानला जातो. तर ज्योतिषशास्त्रानुसारही या सणाला विशेष महत्त्व आहे. यादिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि सूर्य उत्तरायणही याच दिवशी असतो. मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करणे, सूर्यदेवाला जल अर्पण करणे आणि दान करणे याला विशेष महत्त्व आहे. यावेळी 15 जानेवारी 2024 ला मकर संक्रांत साजरी करण्यात येणार असून यादिवशी 77 वर्षांनंतर शुभ योग जुळून आला आहे. (Makar Sankranti 2024 after 77 years amazing yoga Will you be rich if you do this great remedy)
ज्योतिष शास्त्रानुसार या वेळी 15 जानेवारीला मकर संक्रांतीला रवि योग आणि वरियान योग आहे. तब्बल 77 वर्षांनंतर मकर संक्रांतीच्या दिवशी वरियान योग निर्माण होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवसभर वरियान योग असणे खूप शुभ मानलं गेलं आहे. वरियान योग 14 जानेवारी 2024ला दुपारी 2:40 पासून सुरू होणार असून 15 जानेवारी 2024 ला रात्री 11:10 वाजेपर्यंत असणार आहे.
1. या शुभ योगात कुबेर मंत्र, मा लक्ष्मी मंत्र आणि शुक्र मंत्राचा जप केला धनप्राप्ती होते. याशिवाय जमीन खरेदी करणे, नवीन कार घेणे, गृह प्रवेश करणं, मुंडन करणे, घराचे बांधकाम सुरू करणे या गोष्टी वरियान योगात फलदायक ठरतात.
2. मकर संक्रांतीला घरी आंब्याच्या लाकडाने हवन करणे शुभ मानले जाते. यामध्ये गायत्री मंत्राचा 108 वेळा जप करताना तीळ अर्पण केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते. घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढण्यास मदत मिळते.
3. मकर संक्रांतीचा दिवस सूर्यदेवाची पूजा करण्यासाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो. पाण्यात लाल चंदन, लाल फुलं, काळे तीळ आणि गूळ टाकून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्यानं मान-सन्मान वाढीस मदत मिळते. करिअर सूर्यासारखे चमकतं असं ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ म्हणतात.
4. मकर संक्रांतीच्या दिवशी दानाचे विशेष महत्त्व असल्यामुळे या दिवशी तीळ, घोंगडी, लाल वस्त्र, लाल मिठाई, शेंगदाणे, तांदूळ, मूग डाळ खिचडी, गूळ आणि काळी उडीद डाळ दान केल्याने शनि, राहू-केतू आणि सूर्याची शुभफळ तुम्हाला मिळतो.
5. या दिवशी गाईंना हिरवा चारा, मुंग्यांना साखर आणि पीठ, माशांना पिठाच्या गोळ्या आणि पक्ष्यांना बाजरी दिल्यास पैसाचा मार्ग मोकळा होतो.
6. या दिवशी मूठभर काळे तीळ कुटुंबाच्या डोक्यावरुन 7 वेळा उतरावे आणि उत्तर दिशेला फेकून द्यावे. या उपायामुळे कर्जाच्या समस्येतून तुमची सुटका होते.
7. मकर संक्रांतीच्या दिवशी श्राद्ध विधी केल्यास पितर वर्षभर प्रसन्न राहतात अशी मान्यता आहे.
8. मकर संक्रांतीच्या दिवशी तुपाचं सेवन आणि दान केल्याने कीर्ती आणि भौतिक सुख मिळतं.
9. मकर संक्रांतीच्या दिवशी तुळस, तांबे, सुहाग साहित्य, तीळ, झाडू खरेदी करणे खूप शुभ मानलं गेलं आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)