Kalashtami 2024 : कालाष्टमीला गजलक्ष्मी राजयोग! 'या' राशीच्या लोकांसाठी सुवर्ण संधी

Kalashtami 2024 : आज कालाष्टमीला वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गजलक्ष्मी राजयोग निर्माण झालाय. याचा लाभ 5 राशीच्या लोकांना होणार आहे. 

Updated: May 30, 2024, 09:00 AM IST
Kalashtami 2024 : कालाष्टमीला गजलक्ष्मी राजयोग! 'या' राशीच्या लोकांसाठी सुवर्ण संधी  title=
Kalashtami gajlaxmi rajyog Golden opportunity these zodiac signs

Kalashtami 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ राशीत गुरु आणि शुक्राचा संयोगातून गजलक्ष्मी राजयोग निर्माण झाला आहे. कुंभ राशीत चंद्र असून तिथे शनिदेव पूर्वीपासूनच विराजमान आहेत. अशात कालाष्टमी आजचा दिवस काही राशींसाठी सुवर्ण संधी असणार आहे. आज शिवाचं उग्र रूप असलेल्या कालभैरवाची पूजा करण्यात येणार आहे. कालाष्टमीला गजलक्ष्मी राजयोग काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. (Kalashtami gajlaxmi rajyog Golden opportunity these zodiac signs)

मिथुन रास (Gemini Zodiac)

मिथुन राशीच्या लोकांसाठी कालाष्टमीचा दिवस फलदायी ठरणार आहे. या लोकांच्या आत्मविश्वास आणि दृढनिश्चयाची भावना मजबूत होणार आहे. व्यवसायातील अडचणी दूर होमार आहे. उसणे पैसे घेतले असाल तर ते परत करण्यात यश येणार आहे. नोकरदारांना नशिबाची साथ मिळणार आहे. उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये वाढ होणार आहे. मदतीने अनेक अपूर्ण कामेही पूर्ण होणार आहेत. 

सिंह रास (Leo Zodiac) 

कालाष्टमी या राशीच्या लोकांसाठी खूप खास आहे. या लोकांच्या बोलण्यात गोडवाआणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वातही सुधारणा होणार आहे. त्यामुळे तुमच्या प्रतिष्ठेत चांगली वाढ होणार आहे. नवीन मित्रही भेटणार आहेत. व्यावसायिक प्रगतीसाठी नवनवीन रणनीती बनवण्यात यशस्वी होणार आहे. तुम्हाला कुटुंब आणि मित्रांकडून चांगली बातमी मिळणार आहे. एकापेक्षा जास्त स्त्रोतांकडून पैसे मिळाल्यामुळे तुमची बँक बॅलन्स वाढणार आहे.

तूळ रास (Libra Zodiac)  

तूळ राशीच्या लोकांसाठी कालाष्टमीचा दिवस खूप फलदायी असणार आहे. तूळ राशीचे लोक कामाने समाजात एक वेगळे स्थान निर्माण होणार आहे. जीवनात ज्या काही अडचणी येत होत्या त्याही भगवान विष्णूच्या कृपेने दूर होणार आहे. तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होणार आहे. सर्व कामं हुशारीने पूर्ण करण्यात यशस्वी होणार आहेत. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रात तुम्हाला चांगला नफा मिळणार आहे. वैवाहिक जीवनात तुमच्या जोडीदारासोबत काही वाद चालू असतील तर ते दूर होणार आहेत. 

वृश्चिक रास (Scorpio Zodiac)   

या राशीच्या लोकांसाठी कालाष्टमीचा दिवस लाभदायक सिद्ध होणार आहे. हे लोक स्वतःच्या तसंच संपूर्ण कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यात येणार आहे. धार्मिक कार्यात सक्रिय भाग घेणार आहात. तुम्ही कोणत्याही अडचणीशिवाय अनेक माध्यमांतून पैसे कमवण्यात यशस्वी होणार आहात. व्यावसायिकांना यश मिळणार असून जास्त नफा मिळवण्यातही ते यशस्वी होणार आहे. नोकरदारांना शुभ परिणाम मिळणार असून पगारवाढीची प्रतीक्षाही संपणार आहे. 

मीन रास (Pisces Zodiac)  

या राशीच्या लोकांसाठी कालाष्टमीचा दिवस खूप उत्तम असणार आहे. या लोकांना कोणत्याही गुंतवणुकीतून चांगला नफा मिळणार आहे. परदेश दौऱ्यावर जाण्याची संधीही मिळणार आहे. नातेवाइकांच्या शिकवणीचे पालन केल्याने चांगले नाव कमवाल आहात. धार्मिक आणि सामाजिक कार्य करून मानसिक शांतीही तुम्हाला लाभणार आहे. भगवान विष्णूच्या कृपेने मालमत्तेशी संबंधित कोणतेही प्रकरण सोडवले जाणार आहे. तुमच्या नेतृत्वाच्या प्रयत्नांमध्ये सुधारणा होणार आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)