Numerology Holi 2024 Tips in Marathi : अंकशास्त्रानुसार रंगांचा हा ग्रह आणि अंकाशी संबंध आहे. होळीचा उत्साह आनंदायी करण्यासाठी 2, 11, 20, 29 या तारखेला जन्मलेल्या लोकांनी काय करावं याबद्दल एस्ट्रो आणि अंकशास्त्र तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी सांगितलं आहे. 2, 11, 20, 29 या तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक हा अंकशास्त्रानुसार 2 मानला जातो. या मूलांकांच्या लोकांनी कुठल्या रंगाने होळी खेळावी, त्यादिवशी कुठल्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबद्दल कविता यांनी सांगितलंय. (Holi Numerology Tips What should people with birth date 2 11 20 29 lucky on Holi 2024)
2 ही चंद्राची संख्या असून चंद्राच्या शुभकार्यात सर्व प्रकारचे जल रंग फायद्याचे ठरतात. होळीचा उत्साह वाढविण्यासाठी 2, 11, 20, 29 या जन्मतारखेच्या लोकांनी सकाळी लवकर उठून भगवान शंकराची पूजा करायची आहे. भोलेनाथाला यांनी लोकांनी गंगाजल, बेलपत्र, शुद्ध तूपाचा दिवा लावाव, आणि त्यांनी होळीचा उत्साह सुरु करावा. या लोकांनी पांढऱ्या रंगाचे वस्त्र घालावेत. महिलांनी सिल्वर दागिने घालू शकता.
चंद्र हा आपल्या मन आणि पाण्याचा कारक आहे. त्यामुळे आपल्या मनाला आनंदी ठेवण्यासाठी होळीच्या दिवशी पांढरा, सिल्वर, फिकट पिवळा आणि फिकट हिरवा रंगाने होळी खेळावी. त्याशिवाय तुम्ही नारंगी आणि फिकट गुलाबी रंगानेही होळीचा आनंद लुटू शकता. या लोकांनी खास करुन रंगाऐवजी पाण्याने होळी खेळावी. या लोकांनी काळा आणि गडद निळा रंगापासून लांब राहावे.
नंबर 2 असलेले लोक हे खूप चांगले होस्ट असतात. त्यामुळे लोकांनी यावेळी होळीचं आयोजन करताना पाहुणचारामध्ये कुठलीही कसर ठेवू नयेत. यादिवशी लोकांना खूष ठेवा, त्यांची काळजी घ्या आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करा. असं केल्यामुळे त्यांच्या शुभेच्छामधून तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण करु शकता.
होळीच्या दिवशी घरातील ज्येष्ठ महिला किंवा आईला काही ना काही भेटवस्तू नक्की द्या. यामुळे तुमच्या आयुष्यात त्यांचा आशिर्वाद कायम राहील आणि तुमचं मन कायम शांत राहिल.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती अंक शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)