Holi Horoscope 2023 : या होळीला तुमच्या नशिबात धनलाभ? जाणून घ्या होळीचं राशीभविष्य

Holi Horoscope 2023 : होळी (Holi 2023) म्हणजे नकारात्मक गोष्टींवर विजय...होळीच्या अग्नीत वाईट गोष्टींचा विनाश करायचा. आयुष्यात विविध रंगाप्रमाणे फक्त आनंद आणि सुख राहावं. असा होळीचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या होळीचं राशीभविष्य...(Today Horoscope)

Updated: Mar 5, 2023, 11:57 PM IST
Holi Horoscope 2023 : या होळीला तुमच्या नशिबात धनलाभ? जाणून घ्या होळीचं राशीभविष्य title=
Holi Horoscope 2023 6 March 2023 Know your zodiac sign in marathi

Holi Horoscope 2023 Know your zodiac sign in marathi : दिवाळीनंतर देशभरात सर्वात उत्साहात मोठा दुसरा सण म्हणजे होळी...सोमवारी 6 मार्चला महाराष्ट्रात (dhulivandan date in maharashtra 2023) होळी पेटवली (Holi 2023 Date in Maharashtra) जाईल. तर 7 मार्चला पूर्व भारतात होलिका दहन केलं जाणार आहे. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळीचा सण साजरा केला जातो. होळीचा सण नकारात्मक गोष्टीवर मात करुन आयुष्यात सकारात्मकता आणं. असा हा होळीचा (Holi Horoscope 2023 ) दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार आहे ते जाणून घेऊयात. (6 March 2023 Horoscope)

मेष (Aries)

या राशीच्या लोकांसाठी होळीचा सण आयुष्यात आनंद आणि उत्साह घेऊन येणार आहे. होळीच्या दिवशी तुम्हाला आनंदी बातमी मिळणार आहे. प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळणार आहे. (Holi Horoscope 2023 6 March 2023 Know your zodiac sign in marathi)

वृषभ (Taurus)

या राशीच्या लोकांना होळीचा दिवस खूप खास असणार आहे. तुम्हाला सप्रराईज गिफ्ट मिळणार आहे. नातेवाईकांसोबत आनंदात हा दिवस साजरा कराल. भाऊ बहिणीचं नात होळीच्या दिवशी अजून घट्ट होईल. 

मिथुन (Gemini)

या राशीच्या लोकांसाठी होळीचा दिवस धनलाभ घेऊन येणार आहे. तुमचं प्रमोशन आणि इन्क्रीमेंट होणार आहे. कुटुंब आणि मित्रजणांसोबत होळीचा उत्सव साजरा करणार आहात. उद्योगपतींना काम आणि घर यांच्यामध्ये समन्वय साधावं लागणार आहे. 

कर्क (Cancer)

ही होळी तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येणार आहे. जीवनात सकारात्मक बदलामुळे ही होळी तुमच्या कामय लक्षात राहणार आहे. अनेक लोकांच्या भेटीगाठी होणार असल्याने तुम्ही उत्साही राहणार आहात. 

सिंह (Leo)

ही होळी या राशीच्या लोकांसाठी नातेसंबंध घट्ट करणारी ठरणार आहे. तुम्ही कुटुंबाला जास्त वेळ देणार आहात. अगदी त्यांचासोबत सहलीवर जाण्याचा विचार कराल. शिवाय आयुष्यातील अडचणी या होळीसोबत नष्ट होतील. 

कन्या (Virgo)

ही होळी या राशीच्या लोकांसाठी सकारात्मकदृष्टीकोन घेऊन येणार आहे. होळीच्यानिमित्ताने तुम्ही आनंद राहणार आहात. त्यामुळे मनातील गोंधळ दूर होऊ तुमचं मन शांत होणार आहे. याचा फायदा प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळणार आहे. 

तूळ (Libra)

या राशीच्या लोकांसाठी होळी जरा नुकसानदाय ठरणार आहे. त्यांचं आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे त्यांचा आयुष्यात अनेक समस्या येणार आहेत. समजूतदारपणा आणि संयमाने या अडचणीवर तुम्ही मात करु शकाल. 

वृश्चिक (Scorpio)

हा राशीच्या लोकांसाठी होळी धनलाभ घेऊन आली आहे. नोकरीच्या शोधता असणाऱ्या नोकरीची ऑफर मिळेल.  तर नोकरदार वर्गाला वेतनवाढ आणि प्रमोशन होणार आहे. अविवाहित लोकांच्या लग्नाचा योग आहे. 

धनु (Sagittarius)

या राशीच्या लोकांनी होळीच्या दिवशी तब्येतीची काळजी घ्यावी. बाहेरून आणलेले खाद्यपदार्थ त्यांनी खाऊ नयेत. लव्ह लाईफमध्ये आनंदाचं वातावरण राहणार आहे. लग्नाचा विचार करत असाल तर ही योग्य संधी आहे. 

मकर (Capricorn)

या राशीच्या लोकांसाठी होळीचा दिवस आर्थिकदृष्टा कठीण असणार आहे. तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल अन्यथा तुम्ही कर्जबाजारी होऊ शकता. हा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. 

कुंभ (Aquarius)

होळीचा दिवस तुमच्या आयुष्यात भरपूर आनंद घेऊन येणार आहे. मानसिकदृष्ट्या तुम्ही शांत आणि आनंदी राहणार आहात. होळीच्या दिवशी तुम्हाला आनंदाची बातमी मिळणार आहे. मात्र आर्थिक व्यवहारासंदर्भात जरा जपून व्यवहार करा. 

मीन (Pisces)

होळीचा सण तुमच्यासाठी धनसंपदा घेऊन येणार आहे. आयुष्यात मोठं बदल होणार आहे त्यामुळे त्या बदलाासाठी तयार राहा. होळीचा उत्सव तुमच्या कुटुंबात आनंद घेऊन येणार आहे. जोडीदारासोबत तुमचं नातं अधिक मजबूत होणार आहे. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)