Holika Dahan 2023: होलिका दहनात चुकूनही 'या' झाडांचा वापर करु नका; होईल मोठं नुकसान

Holika Dahan Shubh Muhurat 2023 : यंदा 6 मार्चला होळी आणि 7 मार्चला धुलीवंदनाचा सण साजरा करण्यात येणार आहे. कोरोनाच्या छायेखाली दोन वर्ष घालवल्यानंतर देशासह राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात येणार आहे. 6 मार्चला होळी दहनासाठी शुभू मुहूर्त केवळ दोनच तासच असणार आहे.

Updated: Mar 5, 2023, 11:39 AM IST
Holika Dahan 2023: होलिका दहनात चुकूनही 'या' झाडांचा वापर करु नका; होईल मोठं नुकसान title=

Holika Dahan 2023 Date and Time in Maharashtra : होळीच्या (Holi) पवित्र सणाला अवघा एक दिवस उरलाय. त्यामुळे देशभरात सगळीकडे होळीच्या सणाची तयारी करण्याची लगबग सुरुय. पुरणपोळीच्या नैवेद्यापासून होलिका दहनाच्या (Holika Dahan) कार्यक्रमांची जोरदार तयारी सुरु आहे. पण होलिका दहनाच्या आधी ही बातमी नक्की वाचा. यंदा 6 मार्चला होलिका दहन होणार आहे. यासाठी लाकडांसह (wood) शेणाच्या गोवऱ्याचा वापर करण्यात येतो. मात्र आता होलिका दहनाआधी कोणत्या लाकडांचा वापर करताय याचा नक्की विचार करा.

शास्त्रवचनांनुसार, होळी दहनासाठी वापरल्या जाणारी लाकडं योग्य नसल्याच त्याचा तु्म्हाला त्रास होऊ शकतो. सनातन धर्मात वड, पिंपळ, अशोक, शमी, कडुनिंब, आंबा आणि बेल सारख्या बरीच झाडे पूजनीय मानली जातात. त्यांचे लाकूड यज्ञ, विधी इत्यादीसारख्या शुभ कामांसाठी वापरले जाते. अशा परिस्थितीत, या झाडांचे लाकूड होलिका दहानसाठी वापरू नये. यामुळे पिता आणि कालसार्प दोश उद्भवतो. या दोषांमुळे, मुलबाळ होण्याची समस्या निर्माण होते, वैवाहिक जीवनात त्रास होतो. या झाडांचे नुकसान केल्याच घरात दारिद्र्य येते. श्रीमंतही द्रारिद्र्याच्या अंबरठ्यावर येतात.

कोणत्या झाडांचा वापर करायचां?

होलिका दहानसाठी फिकस रेसमोसा आणि एरंडेलची झाडे वापरली पाहिजेत. तसेच वाळलेल्या झाडाचे लाकूड देखील वापरू शकतात. होळीच्या वरच्या भागात गाईच्या शेणापासून बनवलेल्या गोवऱ्यांचा वापर करावा. पर्यावरणाच्या दृष्टीने हे चांगले मानले जाते.

होळी दहनावेळी हे नियम पाळा

धार्मिक श्रद्धेनुसार ज्या जोडप्याला फक्त एकच मूल आहे त्यांनी होलिका दहनासाठी अग्नी प्रज्वलित करू नये. हे शुभ मानले जात नाही. तसेच नववधूने होलिका दहन पाहू नये. आपल्या माहेरी नववधूने पहिली होळी साजरी करावी असेही म्हटले जाते. तसेच होलिका दहानच्या दिवशी पैसे उधार दिल्याने तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो. या दिवशी पैसे उधार दिल्यामुळे पैशाचे नुकसान होते आणि कोणालाही दिलेली रक्कम परत मिळत नाही.

होलिका दहनाचे शुभ मुहूर्त काय आहेत?

पंचांगानुसार ,होलिका दहनाचा शुभ मुहूर्त 6 मार्चच्या संध्याकाळी 6.24 ते 8.51 पर्यंत असणार आहे. या मुहूर्तावर तुम्ही होलिका दहन करू शकता.