Ganesh Chaturthi 2022 : बाप्पाला मोदकच का आवडतात? आज ही गोष्ट नक्की वाचा

तुम्हाला माहितीये का, गणपतीला मोदक इतका आवडतो तरी का?   

Updated: Aug 31, 2022, 08:44 AM IST
Ganesh Chaturthi 2022 : बाप्पाला मोदकच का आवडतात? आज ही गोष्ट नक्की वाचा  title=
Ganesh Chaturthi 2022 why ganpati bappa loves modak

Ganesh Chaturthi Modak Related Stories: गणपती बाप्पाचा उल्लेख झाला, की मोदकांची आठवण ओघाओघानं येतेच. जगात कुठेही जा, आईच्या किंवा आजीच्या हातचा मोदक खाण्याचं सुख म्हणजे अवर्णनीय, असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. गणेशोत्सवादरम्यान, बाप्पाला (Naivedya) नैवेद्य दाखवण्याच्या निमित्तानं आपल्या पानातही येणारा मोदक जरा जास्तच चवीष्ट लागतो. पण, तुम्हाला माहितीये का, गणपतीला मोदक इतका आवडतो तरी का? (Ganesh Chaturthi 2022 why ganpati bappa loves modak )

गणपतीला एकदंत असंही म्हणतात.  असं सांगितलं जातं की, बाप्पांचा एक दात तुटला तेव्हापासून त्यांना हे नाव पडलं. एक दात नसल्यामुळं त्यांच्यासाठी मऊसूत मोदक तयार करण्यात आले, तेव्हापासूनच गणरायाचं हे आवडतं खाद्य ठरलं. (Ganesh Bhog Modak)

आरोग्यास लाभदायक मोदक (Modak for good health)
मोदक तयार करण्यासाठी स्वच्छ धुतलेल्या तांदुळाचं सुगंधी पीठ, तूप, मैदा, खवा, गूळ आणि नारळ असे पदार्थ वापरले जातात. त्यामुळे मोदक आरोग्यासाठीही गुणकारी मानला जातो. या पदार्थाला अमृताईतकं महत्त्वं आहे. 

गणपतीच्या हातातील मोदक अतीव महत्त्वाचा... 
यजुर्वेदात (Yajurveda) गणपतीला ब्रम्हांडाचा कर्ताधर्ता मानलं आहे. बाप्पाच्या हातातील मोदकाला ब्रम्हांडाचं स्वरूप प्राप्त आहे. असं म्हणतात की, गणरायानं ब्रह्मांड धारण केलं आहे. प्रलयकाळात (Ganpati bappa morya) गणेशजी ब्रम्हांडरूपी मोदक खाऊन सृष्टीचा अंत केला आणि पुन्हा सृष्टीच्या आरंभासाठी ब्रम्हांडाची रचना केली असं म्हटलं जातं. गणेश पुराणातही याचा उल्लेख आढळतो.