Ganesh Chaturthi 2022: गणेश चतुर्थी दिवशी विघ्नहर्त्या गणरायाला या मंत्रानी करा प्रसन्न, सर्व अडथळे होतील दूर

Ganesh Mantra : आज गणेश चतुर्थी साजरी होत आहे. (Ganesh Chaturthi 2022) 10 दिवस साजरा होणारा गणेशोत्सवही या दिवसापासून सुरु होत आहे. गणपतीला वाहिलेला हा सण खूप महत्त्वाचा आहे.  

Updated: Aug 31, 2022, 08:48 AM IST
Ganesh Chaturthi 2022: गणेश चतुर्थी दिवशी विघ्नहर्त्या गणरायाला या मंत्रानी करा प्रसन्न, सर्व अडथळे होतील दूर  title=

मुंबई : Ganesh Mantra : आज गणेश चतुर्थी साजरी होत आहे. (Ganesh Chaturthi 2022) 10 दिवस साजरा होणारा गणेशोत्सवही या दिवसापासून सुरु होत आहे. गणपतीला वाहिलेला हा सण खूप महत्त्वाचा आहे. हिंदू धर्मात गणेशाला (Ganpati Festivals) प्रथम पूज्य देवता मानले जाते. श्रीगणेशाला सर्व दु:ख दूर करणारे मानले जाते. श्रीगणेशाची पूजा केल्यानंतर कोणतेही काम केल्यास ते कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते, असा विश्वास आहे. 

गणपती बाप्पाची पूजा करण्यासोबतच श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी अनेक मंत्र (Ganesh Mantra) सांगण्यात आले आहेत. गणेश उत्सवाच्या या 10 दिवसांमध्ये भगवान गणेशाच्या या चमत्कारी मंत्रांचा जप करून तुम्ही जीवनात आनंद मिळवू शकता. चला जाणून घेऊया बाप्पाचे (Bappa Morya) काही मंत्र आणि त्यांचे फायदे. 

Ganesh Chaturthi 2022: Why looking at moon is considered 'inauspicious' on this day; know story, avoid bad luck!

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। 
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥

गणपतीला प्रसन्न करायचे असेल तर हा मंत्र महत्वाचा आहे. हा सर्वात सोपा मंत्र मानला जातो. असे मानले जाते की हे मंत्र जितके सोपे आहेत तितकेच ते शक्तिशाली आहेत. 

Ganesh Chaturthi 2022: Take a glimpse of FIRST look of Mumbai's iconic Lalbaugcha Raja

ओम गं गणपतये नम 
: जर तुमच्या जीवनात काही समस्या असतील आणि तुम्हाला त्या सर्व समस्यांपासून मुक्ती मिळवायची असेल, तर गणेशजींच्या या मंत्राचा जप करा. श्रीगणेशाचा हा मंत्र इतका चांगला आहे की त्याचा जप केल्याने जीवनातील सर्व अडथळे आणि संकटे दूर होतात.

Ganesh Chaturthi 2022: Ganpati puja at home, puja tithi, vidhi and rituals

गणपूज्यो वक्रतुण्ड एकदंष्ट्री त्रियम्बक:। 
नीलग्रीवो लम्बोदरो विकटो विघ्रराजक :।। 
धूम्रवर्णों भालचन्द्रो दशमस्तु विनायक:। 
गणपर्तिहस्तिमुखो द्वादशारे यजेद्गणम।।'

मान्यतेनुसार जर तुमच्या कुंडलीत ग्रह दोष असतील तर गणेशोत्सवादरम्यान या मंत्राचा जप करा. या मंत्राने गणपतीच्या 12 नावांचा जप करावा. गणपतीसमोर मंदिरात या मंत्राचा जप केल्यास शुभ परिणाम प्राप्त होतात. 

Ganesh Chaturthi 2022: 5 iconic Ganesh temples across India for devotees to visit

त्रयीमयायाखिलबुद्धिदात्रे बुद्धिप्रदीपाय सुराधिपाय। 
नित्याय सत्याय च नित्यबुद्धि नित्यं निरीहाय नमोस्तु नित्यम्।

 
जर तुम्ही एखाद्या कामावर खूप मेहनत करत असाल आणि ते काम करताना काही चुकत असेल तर या मंत्राचा जप करा. या मंत्राने तुमचे सर्व बिघडलेले काम पूर्ण होईल. खूप मेहनत करुनही तुम्हाला योग्य ठिकाणी स्थान मिळत नसेल तर गणेश चतुर्थीच्या दिवशी या मंत्राचा 21 वेळा जप करा. तुमचे काम झालेच समजा.