मुंबई : प्रत्येकाला झोपत अनेक स्वप्न पडतात. त्यांपैकी काही स्वप्न हे आपण झोपेतून उठल्यावर विसरुन जातो. या स्वप्नांपैकी फार कमी स्वप्न अशी असतात, जी आपल्या लक्षात राहातात. ज्याचा आपण संदर्भ लावण्याचा प्रयत्न करतो, परंतु आपल्याला त्याचं उत्तर काही मिळत नाही. कारण बऱ्याचदा अर्ध स्वप्न आपल्या लक्षात राहातं. ज्यामुळे आपल्याला त्याची उत्तरं मिळवणं कठीण होऊन बसतं. बऱ्याचदा आपल्याला अशी स्वप्न पडतात की, ज्याचा आपल्या आयुष्याशी काहीही संबंध नसतो. तर काही घटनांचा आपल्या भूतकाळ किंवा भविष्यकाळाशी संबंध असतो.
तुम्हाला माहितीय का की, या अशा स्वप्नाचा देखील विशेष अर्थ असतो आणि ते भविष्यातील काही घटनांबाबत आपल्याला सांगत असतात.
प्रत्येक स्वप्नाचा अर्थ असेलच असे नाही, पण काही स्वप्नांचा निश्चितच एक विशेष अर्थ असतो असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. जसे स्वप्नात अनेकवेळा आपण एखाद्या पूर्वजांना हसताना पाहतो, त्याचा अर्थ असा होतो की त्यांची कृपा आपल्यावर आहे, याशिवाय अनेकवेळा आपल्याला स्वप्नात देव दिसतो, तेव्हा समजून घ्या की, देवाची कृपा तुमच्यावर होणार
काही अशी स्वप्नं असतात जी तुम्हाला भविष्यातील होणाऱ्या घटनांबाबत आगामी सूचित करतात.
या व्यतिरिक्त काही वेळा काही स्वप्ने असेही दर्शवतात की आपल्या आगामी काळात धनहानी किंवा आरोग्याची समस्या असू शकते. चला तर जाणून घेऊया की, कोणत्या स्वप्नांचा काय अर्थ असतो.
असे मानले जाते की, जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात एखाद्या खास व्यक्तीचा मृत्यू दिसला, तर ते एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या आजाराचे लक्षण असू शकते आणि या स्वप्न तुमच्या आयुष्याशी संबंधित असू शकतो.
हे स्वप्न तुमच्यासाठी किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीला येणाऱ्या शारीरिक धोक्याची जाणीव होण्यासाठी चेतावणी देऊ शकतात. म्हणूनच, जर तुम्हाला असे स्वप्न दिसले, तर तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत थोडे सावध राहण्याची गरज आहे.
कुठून तरी पडण्याची स्वप्नं अनेकदा नियंत्रण गमावण्याच्या भीतीतून उद्भवतात जर तुम्हाला हे स्वप्न पडलं असेल तर तुम्ही तुमच्या सद्य परिस्थितीचे मूल्यांकन करून समस्या ओळखण्याचा प्रयत्न करा. हे तुमच्यातील असुरक्षितता, अस्थिरता आणि चिंता दर्शवते.
अशा प्रकारचे स्वप्न तुमच्या भविष्यात किंवा तुमच्या करिअरमध्ये काही बदल होत असल्याचे सूचित करते. जर तुम्हाला असे काही स्वप्न पडले असेल तर तुम्ही सावध असले पाहिजे की, तुमच्या करिअरमध्ये चढ-उतार होणार आहेत.
स्वप्नात धान्य दिसणे हे शुभ संकेत आहे, परंतु जर तुम्हाला स्वप्नात तांदळाचा ढीग दिसला तर ते तुमच्यासाठी धनहानी होण्याचे संकेत आहे. असे स्वप्न दर्शविते की, तुमच्या ठेवी किंवा मालमत्ता लवकरच चुकीच्या हातात पडणार आहेत.
पाणी भावनांचे प्रतिनिधित्व करते, म्हणून जर तुम्ही पाण्यात बुडत असताना संघर्ष करत असाल, तर तुमच्या भावना तुम्हाला तुमच्या जीवनातील अशा गोष्टींमध्ये मदतीसाठी बोलावत आहेत, जिथे तुमचं नियंत्रण बिघडणार आहे. तसेच पाण्यात बुडणे हे करिअरमधील अपयशाचे संकेत देखील असू शकतात.
तुम्हाला ही गोष्ट ऐकायला थोडी विचित्र वाटेल, पण जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात स्मार्ट फोन दिसला, तर तुम्हाला थोडे सावध राहण्याची गरज आहे. वास्तविकपणे तुमच्या स्वप्नात स्मार्टफोन पाहणे हे एक लक्षण आहे की तुम्ही एखाद्या प्रिय व्यक्तीला गमावू शकता.
याशिवाय, हे जीवनात पैशाची हानी देखील दर्शवते. जर तुम्हाला असे कोणतेही स्वप्न दिसले तर तुम्ही तुमचे पैसे कुठेही हुशारीने खर्च करावे, जेणेकरून तुमचे पैसे कमी होणार नाहीत.
जर तुम्हाला स्वप्नात तुटलेले दात दिसत असतील, तर तुम्हाला थोडं सावध राहण्याची गरज आहे. दात असे दर्शवतात की, तुम्ही दिवसेंदिवस म्हातारे होत आहात आणि तुमचा मृत्यू देखील होऊ शकतो. इतकेच नाही तर कधी कधी दात तुटणे हे तुमच्यासाठी धनहानी देखील सूचित करते.
जर तुम्ही तुमच्या स्वप्नातील एखाद्या गोष्टीपासून दूर पळत असाल, तर तुमचे मन तुम्हाला नात्यात समस्या असल्याचे संकेत देत आहे. तुसेच तुमचा कोणीतरी पाठलाग करताना दिसत असेल तर, गोष्ट तुमच्या आयुष्यातील अशा काही गोष्टींबद्दल दर्शवते ज्याची तुम्हाला भीती वाटते. असे कोणतेही स्वप्न तुम्हाला भविष्यातील एखाद्या मोठ्या घटनेची जाणीव करून देतात.