Surya Gochar: धनु सक्रांतीमुळे बनणार 2 खास राजयोग; 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार लाभ

Surya Gochar: धनु संक्रांतीपासून तयार झालेल्या राजयोगांच्या प्रभावामुळे काही राशींच्या व्यक्तींना विशेष लाभ मिळणार आहे. यावेळी काही राशींच्या व्यक्तींना लाभ मिळणार आहे तर काहींच्या करिअरमध्ये प्रगती होणार आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Dec 14, 2023, 09:20 AM IST
Surya Gochar: धनु सक्रांतीमुळे बनणार 2 खास राजयोग; 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार लाभ title=

Surya Gochar: 2 दिवसांनी ग्रहांचा राजा सूर्य धनु राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रात या घटनेला धनु संक्रांत म्हणटलं जातं. धनु राशीत सूर्याच्या गोचरामुळे दोन राजयोग तयार होणार आहेत. धनु राशीमध्ये आधीपासूनच असलेल्या बुधासोबत सूर्य बुधादित्य राजयोग तयार होतोय. तर डिसेंबरच्या अखेरीस मंगळ सुद्धा वृश्चिकातून धनु राशीत गोचर करणार आहे. त्यामुळे यावेळी आदित्य मंगळ राजयोग तयार होणार आहे.

धनु संक्रांतीपासून तयार झालेल्या राजयोगांच्या प्रभावामुळे काही राशींच्या व्यक्तींना विशेष लाभ मिळणार आहे. यावेळी काही राशींच्या व्यक्तींना लाभ मिळणार आहे तर काहींच्या करिअरमध्ये प्रगती होणार आहे. पाहूया या 2 राजयोगांमुळे कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे. 

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्याचे हे गोचर फलदायी मानलं जातंय. या काळात तुमची संपत्ती आणि प्रतिष्ठा वाढणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रातही तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळणार आहेत. यावेळी चांगली बातमी मिळू शकते. नोकरीच्या ठिकाणी तुमची प्रगती होण्याची शक्यता आहे. नोकरदारांना काही नवीन जबाबदारी मिळू शकते. अडकलेले किंवा रोखलेले पैसे परत मिळू शकतात. 

तूळ रास

सूर्याचं हे गोचर तूळ राशीच्या लोकांसाठी अनुकूल परिणाम देणारं असणार आहे. या काळात तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असणार आहात. तुमची बोलण्याची शैली सुधारणार आहे. व्यावसायिक जीवनात प्रगती कराल. पैसे कमावण्याच्या चांगल्या संधी मिळणार आहे. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. तुमच्या कमाईतही वाढ होईल.

धनु रास

धनु राशीतील सूर्याचे गोचर अनुकूल परिणाम देणारं मानलं जातंय. धार्मिक कार्याकडे तुमचा कल वाढेल आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. सरकारी नोकरीसाठी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळणार आहे. खासगी नोकरी करणाऱ्यांसाठीही हा काळ यशाचा असणार आहे. नोकरदारांसाठी काळ चांगला राहील. विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेत यश मिळू शकतं.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )