Horoscope : श्रावणातील शेवटचा दिवस कसा असेल? 12 राशींवर काय होणार परिणाम?

 Todays Horoscope : आज मंगळवार 3 सष्टेंबर आजचा दिवस मंगळागौरी पूजनाचा दिवस आहे. आज श्रावणातील शेवटचा दिवस आहे. या सगळ्याचा 12 राशींवर काय होणार परिणाम? 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Sep 3, 2024, 07:19 AM IST
Horoscope : श्रावणातील शेवटचा दिवस कसा असेल? 12 राशींवर काय होणार परिणाम?  title=

आजचा दिवस हा काही ठराविक राशींसाठी विशेष लाभदायक असणार आहे. यामध्ये मेष, तुळ आणि कुंभ राशीचा समावेश आहे. मंगळवारच्या दिवशी मेष ते मीनपर्यंतच्या राशींवर कसा होणार परिणाम. जाणून घेऊया आजचे 12 राशींचे भविष्य.

मेष 
मेष राशीचे विद्यार्थी परदेशात शिक्षण घेण्याचा विचार करत असाल तर ते प्रयत्न यशस्वी होतील. राजकीय क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल. नोकरीमध्ये आज तुमची जागा निश्चित होईल. लव लाइफमध्ये प्रियकरासोबत खास रोमँटिक क्षण घालवाल. मुलाच्या यशाने आनंद मिळेल. 

वृषभ 
वृषभ राशीचे ग्रह सांगतात की, तुम्हाला पालकांकडून सहकार्य मिळेल. भौतिक सुख साधनांमध्ये वाढ होईल. शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी. पगार वाढ किंवा आर्थिक भरभराट होण्याची दाट शक्यता. एक्सपोर्ट-इमोर्टमध्ये काम करणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी. 

मिथुन 
मिथुन राशींसाठी आजचा दिवस लाभदायक असे. कामाच्याबाबतीत अधिक सतर्क असणे गरजेचे आहे. आर्थिक बाबींचा विचार करुन आज निर्णय घ्यावे लागतील. तुमचा खर्च वाढेल. तुमचे ग्रह सांगतात की, आज रुचकर आनंदाचा लुटता येईल. 

कर्क 
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक ठरेल. हातावर पोट असणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. सरकार क्षेत्रात कार्यरत असणारी मंडळी वेगळ्याच कामात अडकतील. शत्रु आज तुमच्या प्रभाव आणि क्षमतेसमोर नतमस्तक होतील. 

सिंह 
सिंह राशीच्या लोकांच्या कलात्मक आणि रचनात्मक क्षमतेचा विकास होईल. सरकारी क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तीच्या प्रयत्नाने मोठं रखडलेलं काम पूर्ण होईल. यामुळे वरिष्ठांकडून कौतुक होईल. परदेशात जाण्याचा विचार करणाऱ्यांना यश मिळेल. 

कन्या 
कन्या राशीच्या लोकांचा उत्साह महत्त्वाचा ठरणार आहे. भौतिक सुख साधनांमध्ये वृद्धी होईल. भविष्यातील धन-संपत्तीच्या गुंतवणुकीकडे लक्ष द्या. शिक्षण क्षेत्रात प्रगती कराल. ज्येष्ठ मंडळींनी थोडा आराम करावा आजचा दिवस थकवणारा. 

तूळ 
तूळ राशीचे लोक आज आपापल्या क्षेत्रात प्रगती करतील. लव लाइफमध्ये आज जोडीदाराची साथ मिळेल. आज मनातील अपुरी राहिलेली इच्छा आज पूर्ण कराल. भावंडांना मिळून अपेक्षित यश मिळेल. जोडीदारासोबत रोमँटिक क्षण घालवाल. ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात. 

वृश्चिक 
धातूशी संबंधित काम असेल, कारखाना असेल तर नक्कीच प्रगती होईल. आजचा दिवस लाभदायक ठरेल. आजचा दिवस कुटुंबासोबत घालवाल. सुखाचे क्षण आज अनुभवाल. मोठ्या भावाचं मार्गदर्शन आज महत्त्वाचं ठरणार आहे. विचार केलेलं काम पूर्ण होईल. 

धनू 
धर्म, कर्म आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी आज आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. लोनसाठी प्रयत्न करत असलेल्या व्यक्तीला आज फायदा होईल. पालकांमध्ये वडिलांकडून आज लाभ होण्याची दाट शक्यता. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा. 

मकर 
मकर राशीच्या लोकांचा आजचा मंगळवार खास ठरेल. रखडलेल्या सगळ्या कामात यश मिळेल. तुमची मेहनत खूप छान दिसणार आहे. विरोधकांकडून आणि शत्रूंकडून आज सतर्क राहा. जोडीदाराकडून छान साथ मिळेल. विद्यार्थ्यांची प्रगती होईल. शेजारच्यांसोबत वाद होण्याची शक्यता. 

कुंभ 
कुंभ राशीच्या लोकांना कार्यक्षेत्रात यश संपादन कराल. आजचा दिवस राजकीय क्षेत्रातील लोकांसाठी महत्त्वाचा दिवस आहे. धन प्राप्तीसाठी आजचा दिवस महत्त्वाचा. वैवाहिक जीवनात मनमुठाव होण्याची दाट शक्यता आहे. आजचा दिवस सुख साधनांनी भरलेला असेल. 

मीन 
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायी आणि सुखद आहे. लव लाइफमध्ये प्रियकरांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. आज आजारी लोकांची तब्बेत सुधारेल. मुलांच्या जीवनात यश, आनंद मिळेल. मान सन्मान मिळेल. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )