आजचे राशीभविष्य | मंगळवार | २ जुलै २०१९

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस

Updated: Jul 2, 2019, 10:14 AM IST
आजचे राशीभविष्य | मंगळवार  | २ जुलै २०१९ title=

मेष- आर्थिक बाबतीत विचारपूर्वकपणे काम करा. साथीदाराचा सल्ला घ्याल तर, फायदा होईल. पैसे कमवण्याचे नवे बेत आखाल. नोकरीचा एखादा चांगला प्रस्ताव समोर येईल. सहकाऱ्यांची मदत मिळेल. तुमच्या सल्ल्यामुळे इतरांना फायदा होईल. 

वृषभ- चांगल्या योजनांची आखणी आणि विचारसरणी या साऱ्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. विचाराधीन कामं पूर्णत्वास जाण्याचा योग आहे. नोकरी आणि दिनचर्येत काही बदल होण्याची चिन्हं आहेत. नवी खरेदी फायद्याची ठरेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. 

मिथुन- आज तुम्ही नवे प्रयोग कराल. आत्मविश्वास वाढलेला असेल. प्रत्येक प्रकारच्या नातेसंबंधांमध्ये सहजपणा असेल. इतरांशी चांगला मेळ साधाल. कुटुंब किंवा मित्रपरिवारासोबत फिरण्यासाठी बाहेर जाण्याचा योग आहे. 

कर्क- प्रयत्न केल्यास यश मिळेल. आज तुमच्या विचारांनी इतरांना प्रभावित कराल. काही वेळ एकांतात व्यतीत करा, दिवस चांगला जाईल. सहकार्य आणि तडजोत करण्याच्या वितारानेच घराबाहे निघा. नोकरीच्या ठिकाणी एखाद्या गोष्टीसाठी तडजोड करावी लागेल, पुढे याचा फायदाच होणार आहे. 

सिंह- आज सर्व कामं पूर्ण करण्याचा मार्ग अवलंबात आणाल. व्यग्र असूनही आजचा दिवस चांगला असेल. कुटुंबात लहानांची मदत होईल. पदोन्नतीचा योग आहे. प्रेमसंबंधांमध्ये तणाव येई शकतो. आरोग्याची काळजी घ्या. 

कन्या- नोकरीच्या ठिकाणी बऱ्याच अंशी यशस्वी ठराल. करिअरशी निगडीत काही कामांमध्ये यश मिळेल. निराश होऊ नका. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. बढती मिळण्याचा योग आहे. नव्या मित्रांना भेटण्याचा योग आहे. व्यापाऱ्यांना अडकलेले पैसे मिळतील. 

तुळ- स्वत:वर विश्वास ठेवा. माहिती मिळवा. इतरांची भेट घ्या. गरज असल्यासच प्रवास कराल. तुमच्या आयुष्यातील बरेच घटक बदलतील. जुन्या घटना, आठवणी विसरण्याचा प्रयत्न करा. राहणीमानाचा स्तर उंचावण्याचा विचार मनात घर करेल. 

वृश्चिक- नोकरीच्या ठिकाणी एखादी वाढीव जबाबदारी मिळण्याचा योग आहे. नवं काम सुरु करण्याचा विचार कराल. इतरांचं म्हणणं लक्षपूर्वकपणे ऐका. नोकरीच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी दूर होतील. एखाद्या अशा व्यक्तीला भेटण्याचा योग आहे, ज्याचा तुमच्या आयुष्यावर मोठा परिणाम असेल. आर्थिक व्यवहार निकाली काढण्याचा प्रयत्न करा. 

धनू- जास्तीत जास्त कामांमध्ये यशस्वी ठराल. मोठी गुंतवणूक केली असल्यास त्याचा फायदाच होणार आहे. पैसे गुंतवणुकीच्या विचारात असल्याच चर्चा करा. कोणतीही संधी गमावू नका. काही आकर्षक व्यक्तींना भेटण्याची संधी मिळेल. नोकरी किंवा व्यापारात काही बदल करण्याचा विचार कराल. 

मकर- बरंच धाडस आणि साततत्याने तुम्ही मेहनत केली होती, त्याचे निकाल आता तुमच्याच बाजूने असतील. जुन्या मित्रांना भेटण्याची संधी मिळेल. जबाबगारी पूर्ण होईल. विचाराधीन कामं पूर्णत्वास जातील. पैसे कमावणं तुमच्यासाठी अत्यंत सोपं असेल. सोबतच्या व्यक्तींची काळजी घ्या. नोकरीच्या ठिकाणी एखादी नवी गोष्ट शिकण्याची संधी मिळेल. 

कुंभ- काही महत्त्वाच्या बदलांना आजपासून सुरुवात होईल. काही गूढ प्रकरणांमध्ये तुंची रुची वाढेल. चांगल्या व्यवहारामुळे तुम्ही यशस्वी व्हाल. सोबतच तुम्हाल भेटणारी मंडळीही आनंदात असतील. साथीदारासोबत बाहेर जाण्याचे योग आहेत. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. 

मीन- चांगली संधी मिळेल. नवे बेत आणि नवे निर्णय असं एकंदर चित्र असेल. नोकरीच्या ठिकाणी नवं काम किंवा एखादा प्रस्ताव समोर येईल. मोठ्या अडचणी दूर होतील. प्रवासयोग आहे. इतरांच्या म्हणण्यावर लक्ष देऊ नका.