Chaturgrahi Yog 2023 : नवरात्रीतील नऊ दिवस अतिशय खास आहे. आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शनि नक्षत्र गोचर करणार आहे. त्यानंतर तूळ राशीत चतुर्ग्रही योग तयार होत आहे. त्यामुळे नवरात्रीत आणि दसरानंतरचा काळ काही राशींसाठी त्रासदायक ठरणार आहे. या चार ग्रहांच्या मिलनाने काही जाचकांना डोकेदुखी ठरणार आहे. येत्या 19 ऑक्टोबरला तूळ राशीत मंगळ, केतु, बुध आणि सूर्य हे एकत्र येणार आहे. आज चंद्र गोचरमुळे ग्रहण योग तयार झाला. त्यानंतर सूर्य आणि केतूच्या भेटीतून परत ग्रहण योग निर्माण होतो आहे. त्यात मंगळ ग्रहाची एन्ट्री झाल्यामुळे चतुर्ग्रही योग विनाशकारी ठरणार आहे. कुठल्या राशींसाठी हा योग घातक ठरणार आहे, जाणून घ्या. (Chaturgrahi Yoga in Libra in Navratri 3 zodiac signs people Crisis will come in the life)
विनाशकारी चतुर्ग्रही योगामुळे वृषभ राशीच्या लोकांसाठी त्रासदायक ठरणार आहे. या राशीच्या कुंडलीत हा योग सहाव्या घरात निर्माण होतो आहे. तर गुरु आणि राहुची युती ही कुंडलीतील 12व्या घरात होत आहे, त्यामुळे या जाचकांना अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे रस्त्याने चालताना असो किंवा वाहन चालवताना काळजी घ्या. तुमचं कुठलं जुन कोर्टाचं प्रकरण सुरु असेल तर त्यात अनेक अडचणी येणार आहेत. तर कौटुंबिक म्हणजे जोडीदारांमध्ये वादविवाद होण्याची भीती आहे. शिवाय आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहा.
विनाशकारी चतुर्ग्रही योगामुळे सिंह राशीच्या लोकांना डोकेदुखी ठरणार आहे. जुन्या आजार पुन्हा डोक वर काढणार आहे. हृदयाची विशेष काळजी घ्या. डॉक्टरांकडे जाणं टाळू नका. कुटुंबातील सदस्यांकडून वाद होण्याची शक्यता आहे. मालमत्तासंबंधात समस्या निर्माण होणार आहे. व्यवसायिकांना या काळात आर्थिक फटका बसणार आहे. या दिवसात सूर्य मंत्राचा जप तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
विनाशकारी चतुर्ग्रही योग तूळ राशीसाठी सर्वाधिक घातक ठरणार आहे. तुमची या काळात चिडचिड करणार आहात. जोडीदारासोबत किंवा घरातील सदस्यांसोबत कारण नसताना तुमचा सतत शाब्दिक बाचाबाची होणार आहे. हृदय आणि किडनीची समस्या तुम्हाला त्रासदायक ठरणार आहे. या काळत कोणाकडून पैसे घेऊन नका. कार्यक्षेत्रात समस्या उद्भवणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)