Lunar Eclipses 2024 : तब्बल 100 वर्षांनी होळीच्या दिवशी चंद्रग्रहण! शनिचा दुर्लभ योग कुठल्या राशींना होणार लाभ?

Chandra Grahan 2024 : वर्षातील पहिलं चंद्रग्रहण हे धुलीवंदन किंवा धुरवडचा दिवशी आल्यामुळे हे ग्रहण कोणत्या राशीसाठी सकारात्मक ठरणार आहे, याबद्दल ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलंय. 

नेहा चौधरी | Updated: Mar 25, 2024, 08:58 AM IST
Lunar Eclipses 2024 : तब्बल 100 वर्षांनी होळीच्या दिवशी चंद्रग्रहण! शनिचा दुर्लभ योग कुठल्या राशींना होणार लाभ? title=
Chandra Grahan on Holi after 100 years Saturn or shani sanyog shash yog will benefit which zodiac signs Lunar Eclipses 2024

Chandra Grahan 2024 : ग्रहण ही खगोलीय घटना असून होळीच्या दिवशी वर्षातील पहिलं चंद्रग्रहण आणि एप्रिल महिन्यात वर्षातील पहिलं सूर्यग्रहण असणार आहे. ज्योतिषशास्त्रात ग्रहण हे अशुभ मानलं जातं. तब्बल 100 वर्षांनी धुलीवंदन किंवा धुरवडीला चंद्रग्रहण आल्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार ही होळी कोणासाठी सकारात्मक तर कोणासाठी नकारात्मक ठरेल ते आनंदी वास्तू आणि ज्योतिषशास्त्र पंडीत आनंद पिंपळकर यांनी सांगितलंय. 
ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहण हे कन्या राशीत होणार आहे. चंद्रग्रहण 25 मार्चला सकाळी 10 वाजून 24 मिनिटापासून दुपारी 3 वाजून 1 मिनिटापर्यंत असणार आहे. या अर्थ ग्रहणाचा कालावधी हा एकूण 4 तास 36 मिनिटाचा आहे. चंद्रग्रहणाला अजून एक दुर्मिळ योग जुळून आला आहे. चंद्रग्रहणाला काही राशींवर शनिदेवाची विशेष कृपा बरसणार आहे. (Chandra Grahan on Holi after 100 years Saturn or shani sanyog shash yog will benefit which zodiac signs Lunar Eclipses 2024)

'या' राशींवर असणार शनिदेवाचा आशिर्वाद!

होळीच्या दिवशी असलेल्या चंद्रग्रहणाला शनिदेव कुंभ राशीत षष्ठ योग निर्माण करत आहेत. याचा फायदा काही राशींना होणार आहे. 

मेष रास (Aries Zodiac)  

चंद्रग्रहणाच्या दिवशी शनिदेवाचा विशेष आशिर्वाद हा मेष राशीच्या लोकांवर बरसणार आहे. या लोकांना आर्थिक फायदा होणार आहे, असं शास्त्रात सांगण्यात आलंय. पुढील 1 महिन्यात जी लोक व्यवसायत करतात त्यांना लाभ होणार आहे. या लोकांच्या सूर्व समस्या होळीपासून दूर होणार आहे. या लोकांनी हातात घेतलेल्या कामांना वेग मिळणार आहे. प्रगती आणि यश तुमची वाट पाहत आहे.

मिथुन रास (Gemini Zodiac)

होळीच्या दिवशी चंद्रग्रहणासोबत शनिदेव मिथुन राशीसाठी सकारात्मक ठरणार आहे. या लोकांची जीवनातील सर्व समस्या हळूहळू नाहीशा होणार आहे. या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली होणार आहे. पुढील एक महिन्या त्यांना कुठल्या ना कुठल्या कामातून यश मिळणार आहे. व्यवसायातून फायदा होणार आहे. 

कुंभ रास (Aquarius Zodiac) 

शनिची रास म्हणजे कुंभ...त्यामुळे होळीच्या दिवशी असलेले चंद्रग्रहण आणि शनिदेवाचा विशेष योग या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. या लोकांना आर्थिक फायदा होणार आहे. वैवाहिक जीवनात आनंद असणार आहे. कुटुंबात आनंदाची बातमी तुमच्या कानावर पडणार आहे. कामाच्या ठिकाणीही यश प्राप्त करण्यात तुम्ही सक्षम होणार आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)