Chandra Grahan Effect 2024: हिंदू मान्यतेनुसार चंद्रग्रहणाच्या दिवशी नकारात्मक शक्ती निर्माण होतात. त्याचा परिणाम माणसाच्या जीवनावर आणि दैनंदिन व्यवहारावर दिसून येतो. त्यामुळे ग्रहणकाळात ज्योतिषशास्त्रात अनेक उपाय आणि खबरदारी सांगितली आहे. ग्रहणकाळात प्रत्येक व्यक्तीने खबरदारी घेतली पाहिजे, परंतु गरोदर महिलांनी यावेळी काही गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहणकाळात नकारात्मक शक्ती प्रबळ असते अशा परिस्थितीत लोकांना या काळात पूजा करू नका किंवा घराबाहेर पडू नका असा सल्ला दिला जातो. पण जर आपण गरोदर महिला आणि त्यांच्या बाळांबद्दल बोललो तर त्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. या काळात ग्रहणाचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर आणि जन्माला न आलेल्या बाळावर होत असल्याचं दिसून येतो. जाणून घ्या चंद्रग्रहण काळात गर्भवती महिलांनी कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी.
ज्योतिष शास्त्रानुसार, यावेळी 2024 सालचे पहिले चंद्रग्रहण फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी 25 मार्च रोजी होत आहे. या दिवशी रंगपंचमीचा सणही साजरा केला जातो. ग्रहणाचा प्रभाव संपूर्ण देशात आणि जगभरात दिसून येईल. यावेळेचे चंद्रग्रहण 25 मार्च रोजी सकाळी 10.24 ते दुपारी 3.01 पर्यंत राहणार आहे. अशा स्थितीत तुम्हाला चंद्रग्रहणाच्या काळात एकूण 4 तास 36 मिनिटे सतर्क राहावे लागेल. अशावेळी गर्भवती महिलांनी काय करावे समजून घ्या.
2024 मधील पहिले चंद्रग्रहण 25 मार्च रोजी होणार आहे. या काळात गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात गर्भवती महिलांनी तीक्ष्ण आणि टोकदार वस्तू वापरणे टाळावे. अशा वेळी कात्री, सुया, चाकू वापरल्यास त्याचा वाईट परिणाम मुलावर होतो.
चंद्रग्रहणाच्या प्रकाशात गरोदर महिलांनी बाहेर पडू नये असे म्हटले जाते. ग्रहणाच्या प्रकाशाचा परिणाम बाळ आणि गर्भवती महिलांच्या आरोग्यावर होतो. यावेळी नकारात्मक शक्ती घरात आणि वातावरणात प्रवेश करतात. त्याचा बाळावर परिणाम होतो.
चंद्रग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांनी झोपू नये असे ज्योतिषी सांगतात. असे म्हटले जाते की, अशा वेळी गर्भवती महिलांनी झोपल्यास त्याचा थेट परिणाम बाळाच्या मानसिक आरोग्यावर होतो. यावेळी महिलांनी जास्तीत जास्त देवाचे नामस्मरण करावे, असे सांगितले जाते. यामुळे नकारात्मक शक्ती शरीरात प्रवेश करू शकत नाहीत.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)