Chandra Grahan 2023 : सूर्यग्रहणानंतर 28 ऑक्टोबरला वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण, 'या' राशींच्या लोकांवर पडले मोठा प्रभाव

Lunar Eclipse 2023 : येत्या शनिवारी 14 ऑक्टोबरला या वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण होणार आहे. त्यानंतर 28 ऑक्टोबरला वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण असणार आहे. या चंद्र ग्रहणाचा काही राशींवर मोठा प्रभाव पडणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: Oct 13, 2023, 05:20 AM IST
Chandra Grahan 2023 : सूर्यग्रहणानंतर 28 ऑक्टोबरला वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण, 'या' राशींच्या लोकांवर पडले मोठा प्रभाव title=
Chandra Grahan 2023 Date Sutak Kaal Timing 2023 Year Second Lunar Eclipse effect on zodiac signs

Lunar Eclipse 2023 : दसरापूर्वी या वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण असणार आहे. येत्या 14 ऑक्टोबरला सर्पपित्री अमावस्याला हे सूर्यग्रहण आहे. तर त्यानंतर दिवाळीपूर्वी या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण असणार आहे. ग्रहण ही खगोलशास्त्रीय घटना असली तरी याला वैदिक ज्योतिषशास्त्रात अतिशय अशुभ मानलं जातं. यंदाचं चंद्रग्रहण अतिशय खास आहे. कारण हे आश्विन शुक्ल पक्षातील पौर्णिमेला असणार आहे. त्याशिवाय या वर्षातील हे एकमेव ग्रहण आहे भारतात दिसणार आहे. त्यामुळे भारतात सुतक काळ पाळला जाणार आहे. 

चंद्रग्रहण तारीख आणि सुतक काळ 

पंचांगानुसार वर्षातील दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण 28 ऑक्टोबर 2023 ला पहाटे 1:05:18 वाजता सुरु होणार असून रात्री 2:24 वाजेपर्यंत असणार आहे. हे ग्रहण भारताशिवाय ऑस्ट्रेलिया, ऑफ्रिका, अमेरिका, कॅनडा आणि हिंदी महासागरातही दिसणार आहे. चंद्रग्रहण सुतक काळ 9 तास आधी पासून सुरु होणार आहे. चंद्रग्रहण काळात पूजेसोबत शुभ कार्याला मनाई असते. तर या काळात मंदिरांचे दरवाजे  बंद असतात. 

 हेसुद्धा वाचा - Surya Grahan 2023 : 178 वर्षांनंतर अश्विनी अमावस्येला वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण, 'या' राशींचं नशीब चमकरणार सूर्यासारख

'या' राशींवर होणार चंद्रग्रहणाचा परिणाम

ज्योतिष शास्त्रानुसार, हे पेनम्ब्रल चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. हे चंद्रग्रहण देखील खास आहे कारण राहु केतू देखील ऑक्टोबरमध्ये आपली स्थिती बदलणार आहे. यामुळे अनेक राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे.

मेष, वृषभ आणि कर्क राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण अशुभ सिद्ध होणार आहे. या लोकांनी सर्वाधिक काळजी घेण्याची गरज आहे. चंद्रग्रहणाच्या दिवशी घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका अन्यथा भविष्यात नुकसान सहन करावा लागू शकतो. शत्रूंमुळे तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकतं. या काळात आरोग्याचीही समस्या उद्धभवणार आहे. 

तरा कुंभ, मकर, मिथुन, तूळ, वृश्चिक, सिंह, धनु आणि मिथुन या राशीच्या लोकांसाठी खूप शुभ सिद्ध होणार आहे. करिअर आणि व्यवसायात प्रगती, कामाच्या ठिकाणी सन्मान आणि अचानक आर्थिक लाभ होणार आहे. तर कन्या राशीच्या लोकांना संमिश्र परिणाम दिसून येणार आहे. 

हेसुद्धा वाचा - Rahu Ketu Gochar 2023 : दिवाळीपूर्वी राहू-केतूचं गोचर, 'या' 5 राशींची लोक 2025 पर्यंत होणार कोट्यधीश

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)