Budh Gochar 2022: बुध-शुक्र युतीमुळे महालक्ष्मी-नारायण योग, 3 राशींसाठी अनुकूल काळ

Lakshmi Narayan Yog Effect On Zodiac Signs: ठरावीक कालावधीनंतर होणाऱ्या गोचरामुळे तूळ राशीत एका पेक्षा जास्त ग्रह एकत्र आले आहेत. ग्रहांच्या युतीमुळे काही शुभ, तर काही अशुभ योग तयार झाले आहेत. या राशीत शुक्र, सूर्य आणि केतु हे तीन ग्रह आधीच ठाण मांडून बसले आहेत. आता बुध ग्रहाने तूळ राशीत प्रवेश केला आहे.

Updated: Oct 27, 2022, 01:10 PM IST
Budh Gochar 2022: बुध-शुक्र युतीमुळे महालक्ष्मी-नारायण योग, 3 राशींसाठी अनुकूल काळ title=

Lakshmi Narayan Yog Effect On Zodiac Signs: ठरावीक कालावधीनंतर होणाऱ्या गोचरामुळे तूळ राशीत एका पेक्षा जास्त ग्रह एकत्र आले आहेत. ग्रहांच्या युतीमुळे काही शुभ, तर काही अशुभ योग तयार झाले आहेत. या राशीत शुक्र, सूर्य आणि केतु हे तीन ग्रह आधीच ठाण मांडून बसले आहेत. आता बुध ग्रहाने तूळ राशीत प्रवेश केला आहे. सूर्य आणि बुधाच्या युतीमुळे बुधादित्य योग आणि शुक्र-बुध युतीमुळे लक्ष्मी नारायण योग तयार झाला आहे. लक्ष्मी नारायण योग हा सर्वात शुभ योग म्हणून गणला जातो. या योगामुळे तीन राशींना विशेष फायदा होणार आहे. तीन राशींवर विष्णु आणि देवी लक्ष्मीची कृपा असणार आहे.

कन्या- बुध-शुक्र युतीमुळे तूळ राशीत लक्ष्मी-नारायण योग तयार झाला आहे. हा योग कन्या राशींच्या लोकांसाठी फलदायी ठरणार आहे. या काळात आर्थिक गणितं वेगाने बदलतील. अडकलेले पैसे तात्काळ मिळतील. नोकरी करण्याऱ्यांच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे.

धनु- लक्ष्मी नारायण योग या राशीसाठी फलदायी ठरणार आहे. या योगामुळे नोकरीच्या नव्या संधी प्राप्त होतील. कामाच्या ठिकाणी मानसन्मान वाढेल. तसेच उत्पन्नात देखील वाढ होईल. या काळात नशिबाची पूर्ण साथ मिळेल.

नोव्हेंबर महिन्यात 5 ग्रहांचा गोचर या जातकांसाठी ठरणार शुभ, तुमची रास आहे का? वाचा

मकर- या राशीसाठी बुध-शुक्र युती शुभ ठरेल. नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल. व्यापारी नवे करार निश्चित करतील. आर्थिक स्थिती या काळात सुधारेल. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचं कौतुक होईल. कुटुंबातील वातावरण चांगलं राहील.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)