Bada Mangal 2023 : आज पहिला मोठा मंगळ! शनिदेवासह बजरंगबलीचा आशीर्वाद मिळण्याचा शुभ योगायोग

Bada Mangal 2023 : आजचा दिवस हनुमान भक्तासाठी खूप खास आहे. ज्येष्ठ महिन्यातील (Jyeshtha Mangalwar) आज पहिला मोठा मंगळ आहे. बजरंबलीचा आशीवार्द मिळण्यासाठी आज शुभ योगायोग जुळून आला. 

नेहा चौधरी | Updated: May 9, 2023, 07:13 AM IST
Bada Mangal 2023 : आज पहिला मोठा मंगळ! शनिदेवासह बजरंगबलीचा आशीर्वाद मिळण्याचा शुभ योगायोग title=
Bada Mangal 2023 jyeshtha month Budhwa mangal puja muhurat vidhi bajrangbali hanuman

Bada Mangal 2023 : ज्येष्ठ महिन्याला सुरुवात झाली आहे आणि आज ज्येष्ठ महिन्यातील पहिला मोठा मंगळ आहे. आज पौराणिक मान्यतेनुसार हनुमानजीच्या जुन्या रुपाची पूजा करण्याचा असते. मोठा मंगळ याचा अर्थ बडा मंगळ या नावाही ओळखला जातो. अशी मानता आहे की, मोठ्या मंगळवारी पूजा केल्याने शनिदेवाच्या साडेसाती आणि धैय्याच्या त्रासापासून मुक्ती मिळते.  

आजच्या दिवशी सुंदरकांड पठण किंवा रामचरित्रमानस पठणाला विशेष महत्त्व आहे. जाणून घेऊया या वर्षातील पहिल्या ज्येष्ठ महिन्यातील मोठा मंगळच्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी (Bada Mangal 2023 jyeshtha month Budhwa mangal Shani Sadesati and Dhaiyya troubles puja muhurat vidhi bajrangbali hanuman)

मोठा मंगळ 2023  शुभ योग  (Bada Mangal 2023)

पंचांगानुसार आज मोठा मंगळाला सिद्ध योग तयार होत असून रात्री 21:15:17 असणार आहे. या काळात मंत्राचा जप, पूजा आणि शुभ कार्य केल्यास यश मिळेल, ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. त्याशिवाय या काळात पूजा, व्रत आणि बजरंगी दान केल्याने शनिदेवाच्या साडेसातीच्या दुःखापासून मुक्ती मिळते, असा समज आहे. मोठा मंगळ हा उत्तरप्रदेशात अतिशय महत्त्वाचा मानला जातो.  

मोठा मंगळ 2023 मुहूर्त  (Bada Mangal 2023)

चार (सामान्य) - सकाळी 09.00 वाजेपासून सकाळी 10.36 वाजेपर्यंत
नफा (प्रगती) - सकाळी 10.36 वाजेपासून दुपारी 12.13 वाजेपर्यंत
अमृत ​​(सर्वोत्तम) - दुपारी 12.13 वाजेपासून दुपारी 01.49 वाजेपर्यंत

मोठा मंगळ 2023 पूजा विधी

सकाळी उठून स्नान करुन व्रताचं संकल्प घ्यावा. त्यानंतर लाल वस्त्र परिधान करुन हनुमानजीची पूजा अर्चा करावी. बजरंगीला सिंदूर अर्पण करा. यानंतर लाल वस्त्र, लाल फुलं, लाल फळं, सुपारी, केवडा अत्तर, बुंदी अर्पण करा. 
ॐ नमो हनुमते रुद्रावताराय विश्वरूपाय अमित विक्रमाय, प्रकटपराक्रमाय महाबलाय सूर्य कोटिसमप्रभाय रामदूताय या मंत्राचा जप करा.
इच्छापूर्तीसाठी आज हनुमान चालिसाचं सात वेळा पठण करा. 
आजच्या दिवशी मुलांना गूळ, पाणी, धान्य दान करण्यास विशेष महत्त्व आहे. 

मोठा मंगळ 2023 तारखा

ज्येष्ठाचा पहिला मोठा मंगळ - 09 मे 2023
ज्येष्ठाचा दुसरा मोठा मंगळ - 16 मे 2023
ज्येष्ठाचा तिसरा मोठा मंगळ - 23 मे 2023
ज्येष्ठाचा चौथा मोठा मंगळ - 30 मे 2023

मोठा मंगळाचे 2023 महत्त्वं (Budhwa Mangal History)

ज्येष्ठ महिन्यातील मोठा मंगळवारी महाभारत आणि रामायणाशी संबंधित एक आख्यायिका आहे. असं म्हणतात की महाभारत काळात भीमाला आपल्या सामर्थ्याचा अभिमान वाटायला लागला आहे. अशावेळी ज्येष्ठ महिन्याच्या मंगळवारी बजरंगबलीने वृ्द्ध माकडाचे रुप धारण करुन भीमाचा गर्व दूर केला होता. तेव्हा पासून हा बुढ़वा मंगळ असंही या दिवसाला म्हटलं जातं. अशी ही एक मान्यता आहे की, या दिवशी वनात श्री रामांना हनुमानजी भेटले होते. 

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)