Astrology Tipes : पाण्यामुळे नवग्रहदोष, संकट दूर होतात? पाणी तुमच्यासाठी कसं ठरेल वरदान? काय सांगते डॉ. जया मदन

Astrology Tipes For Planet : नवग्रहांचा दोष पाण्यापासून दूर करतो येतो असं ज्योतिषशास्त्र डॉ. जया मदन यांनी इन्स्टाग्रामवरील व्हिडीओमध्ये सांगितलं आहे. पाणी आणि ग्रहांचा संबंधाबद्दल काय म्हणाली जया जाणून घेऊयात. 

नेहा चौधरी | Updated: Feb 24, 2024, 03:07 PM IST
Astrology Tipes : पाण्यामुळे नवग्रहदोष, संकट दूर होतात? पाणी तुमच्यासाठी कसं ठरेल वरदान? काय सांगते डॉ. जया मदन  title=
Astrology Tips Does water remove planetary problems or navagrahadefects How can water be a boon for you What does Dr. Jaya Madan

Importance Of Water Astrology Tipes For Planet : पाण्याशिवाय आपण पृथ्वीची कल्पनाही करु शकतं नाही. पाणी हे जीवन आहे असं उगीचच कोणी म्हणत नाही. कारण पाण्याला आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे. तहान भागवण्यापासून ते उपासनेपर्यंत धर्मशास्त्रात अतिशय महत्त्व आहे. पंचतत्वावर आधारित वास्तुशास्त्रात पाण्याला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. हिंदू धर्मात पाणी अत्यंत पूजनीय मानले गेले आहे. सनातन परंपरेत पाणी हे श्रीचे म्हणजेच माता लक्ष्मीचे किंवा दुसऱ्या शब्दांत संपत्तीचे प्रतीक मानलं गेलं आहे. (Astrology Tips Does water remove planetary problems or navagrahadefects How can water be a boon for you What does Dr. Jaya Madan)

ज्योतिषशास्त्रानुसार पाण्याचा मुख्यत: चंद्र आणि शुक्र ग्रहाशी संबंध आहे. त्यामुळे पाण्याचा योग्य वापर करुन तुम्ही तुमच्या कुंडलीतील चंद्र आणि शुक्र बलवान करु शकता. पण तुम्ही पाण्याचा अयोग्य वापर केल्यास चंद्र आणि शुक्र खराब स्थितीत येतात आणि त्याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर होतो. 

पाण्यामुळे नवग्रहदोष, संकट दूर होतात? 

जेव्हा तुम्हाला व्यक्तितव्य मजबूत करायचं असेल तर सूर्यदेवाला पाणी अर्पण करायला हवं. 
जेव्हा तुम्हाला भावनिकदृष्ट्या समतोल राखायचं असेल तर तुम्हाला शिवलिंगवर जल अर्पण करायच आहे. त्यामुळे तुमचा चंद्र मजबूत होतो. 
जेव्हा तुम्हाला आयुष्यात शिस्त आणि सकारात्मक निकाल हवे असतील तर घरातील काम करणारी मंडळी, कुरिअर आणणारा माणूस इत्यादी लोक, जे तुम्हाला मदत करण्यासाठी येतात त्यांना त्यांना पाणी द्या. 
जेव्हा तुम्हाला घरात सुख समृद्धी वाढवायची असेल तर तेव्हा गोड पाणी म्हणजे सरबतचं वाटप करावं. 
जेव्हा तुम्हाला बुद्धीत वाढ करायची आहे, तेव्हा धार्मिक स्थळी म्हणजे मंदिर, मजिद, चर्च, गुरुद्वारा इथे लोकांना पाण्याचं वाटप करा. 
जेव्हा तुम्हाला स्मरणशक्ती वाढ करायची आहे, तेव्हा तुम्ही झाडांना पाणी द्या.

जेव्हा तुम्हाला वाटतं आयुष्यातील संकट संपतच नाही आहे, अशावेळी गरीब लोकांना, गरजू लोक, रेड लाइट एरिया, हॉस्पिटल आणि वृद्धाश्रमात जाऊन पाण्याचं वाटप करा. 
कुंडलीतील राहूचे दोष कमी करायचे असतील तेव्हा, आयुष्यात येणाऱ्या शुभ संधी गमवायची नसेल तर पक्ष्यांना पाणी द्या. 
ज्या वेळी तुम्हाला वाटत आयुष्यात आता काहीच उरलं नाही आहे, अशावेळी केतूला मजबूत करण्यासाठी श्वानाला पाणी द्या.
अशाप्रकारे नऊ ग्रहांचा तुमच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम देण्यासाठी पाण्याचा योग्य उपाय केल्यास ते तुमच्यासाठी वरदान ठरतं, असं डॉ. जया मदनने सांगितलं आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)