Astrology: पतीला आपल्या तालावर नाचवतात या राशीच्या पत्नी, कसा असतो स्वभाव जाणून घ्या

ज्योतिषशास्त्रानुसार, राशीचक्रात 12 राशी असून प्रत्येक राशीचा स्वभाव आणि गुणधर्म वेगळा आहे. 12 राशीनुसार त्याची चिन्हही ठरवलेली आहेत. तसेच प्रत्येक राशीचा स्वामी ग्रह देखील आहे. त्यामुळे स्वभाव(Personality), वागणूक याबाबत राशीवरून अंदाज बांधला जातो. 

Updated: Nov 10, 2022, 08:21 PM IST
Astrology: पतीला आपल्या तालावर नाचवतात या राशीच्या पत्नी, कसा असतो स्वभाव जाणून घ्या title=

Astrology: ज्योतिषशास्त्रानुसार, राशीचक्रात 12 राशी असून प्रत्येक राशीचा स्वभाव आणि गुणधर्म वेगळा आहे. 12 राशीनुसार त्याची चिन्हही ठरवलेली आहेत. तसेच प्रत्येक राशीचा स्वामी ग्रह देखील आहे. त्यामुळे स्वभाव(Personality), वागणूक याबाबत राशीवरून अंदाज बांधला जातो. काही राशीच्या मुली (Girls) इतक्या जबरदस्त असतात की, आपल्या पतीला तालावर (Dominating Girls) नाचवतात. त्यांच्यासमोर पतीची डाळ शिजत नाही. मेष, वृश्चिक, कन्या आणि मकर राशीच्या मुली स्वभावाने सडेतोड आणि करिअरच्या बाबतीत पुढे असतात. चला जाणून घेऊयात या राशींचा स्वभाव कसा असतो.

मेष (Aries)- या राशीचं चिन्ह मेंढा आहे. असं असलं तरी या राशीच्या मुली आकर्षक असतात. यांची बुद्धीही तीक्ष्ण असते. या राशीचा स्वामी मंगळ असल्याने थोड्या तापट असतात. या राशीच्या पत्नी आपल्या पतीला ताब्यात ठेवण्यात यशस्वी ठरतात.

वृश्चिक (Scorpio)- या राशीचं चिन्ह विंचू असून स्वामी मंगळ आहे. त्यामुळे या राशीच्या मुली घरातील काम पटकन करतात. पतीला खूश ठेवण्यात याचा हातखंडा असतो. त्यामुळे या राशीच्या मुली आपल्या पतीला मुठीत ठेवतात. 

Vivah Muhurt 2022: शुभ मंगल सावधान! नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात लग्नासाठी 'या' तारखा शुभ, जाणून घ्या

कन्या (Virgo)- या राशीचं बोधचिन्ह नावाप्रमाणेच आहे. स्वामी बुध असल्याने मुली आणि स्त्रिया स्वभावाने शांत असतात. या राशीच्या मुली चांगल्या जोडीदार असतात. आपल्या पतीची खूप काळजी घेते, त्याच्यावर खूप प्रेम करतात. आपल्या स्वभावाने पतीचे मन जिंकतात. त्यामुळे पती यांचं सर्वकाही ऐकतात.

मकर (Capricorn)- या राशीचं बोधचिन्ह मगर आहे. तर या राशीचा स्वामी शनि आहे. मकर राशीच्या मुली पतीवर अधिराज्य गाजवतात. यांची समजवण्याची शक्ती जबरदस्त असते की एखादी गोष्ट चुटकीसरशी पटवून देतात. या मुली झटपट निर्णय घेऊन पुढे जाण्यावर विश्वास ठेवतात.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)