Cat Good or Bad Luck : भारतातीय घरांमध्ये गाय, म्हशी, पक्षी, श्वान, कासव अगदी मांजरीदेखील पाळल्या जातात. मांजरीबद्दल तसं तर भारतात अनेक अंधश्रद्धा आहेत. घरातून एखाद्या कामासाठी जेव्हा आपण बाहेर पडतो आणि आपल्या समोरून मांजरीने रस्ता ओलांडला तर हे अशुभ संकेत मानले जाते. (astrology Cat Shubh Ashubh signs good or bad luck cat myth and facts in marathi )
असं म्हणतात अशाप्रकारे मांजरीचं तुमच्यासमोरुन जाणं म्हणजे तुमचं होणारं काहीही होतं नाही. तर काळा रंगाची मांजरी तर अशुभचं असते असं म्हणतात. या समाजात मांजरीला नकारात्मक शक्ती मानली जाते. पण यामध्ये किती तथ्य आहे आणि मांजरीसंदर्भात काय शुभ आणि अशुभ संकेतांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
तुमच्या घरात पांढरी मांजर आली तर हे शुभ संकेत आहे, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. पांढऱ्या रंगाची मांजर घरात आल्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि नकारात्मक ऊर्जा घरातून बाहेर जाते असं म्हणतात. पांढरी मांजरी आली म्हणजे न होणारे कामही सहज पूर्ण होते.
- घरात मांजरीने स्वतःच्या मुलाला जन्म दिला तर ते शुभ संकेत असल्याचं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. असं म्हणतात की, घरात मांजरीचं पिल्लू जन्माला आल्याने आर्थिक स्थिती सुधारते. यासोबतच घरात शुभ कार्य घडतं.
- घरात किंवा घराबाहेर मांजरीचं रडणं हे अतिशय वाईट संकेत असते. अशा प्रकारे मांजरीचं रडणं म्हणजे अशुभ गोष्टी घडण्याची शक्यता असते.
- घरातील मांजर मरणे किंवा मांजरीला मारणे हे अशुभ संकेत आहे. असं म्हणतात या गोष्टीमुळे घरावर मोठं संकट येतं.
- तुमच्या घरात किंवा बाहेर मांजरी एकमेकांशी भांडत असल्याचं दिसल्यास याचा अर्थ तुमच्या घरात कटकटी सुरु होणार आहे.