Makar Sankranti 2024 : सूर्य गोचरसह मकर संक्रांतीला 77 वर्षांनंतर अद्भूत योग! 'या' राशींचे लोकं होणार श्रीमंत

Surya Gochar and Makar Sankranti 2024 : पौष महिन्यात सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो त्याला मकर संक्रांत असं म्हणतात. वर्षभरात सूर्य 12 वेळा संक्रमण करतो. मात्र पौष महिन्यातील संक्रमणाला विशेष महत्त्व आहे. सूर्य गोचर आणि त्यासोबत काही शुभ दुर्मिळ योग जुळून आले आहेत. जे काही राशींसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: Jan 14, 2024, 02:02 PM IST
Makar Sankranti 2024 : सूर्य गोचरसह मकर संक्रांतीला 77 वर्षांनंतर अद्भूत योग! 'या' राशींचे लोकं होणार श्रीमंत title=
Amazing yoga after 77 years of Makar Sankranti 2024 due to Sun transit or surya gochar 2024 People of this zodiac sign will be rich

Surya Gochar and Makar Sankranti 2024 : पौष महिन्यात पिता सूर्यदेव पुत्र शनिच्या घरात म्हणजे मकर राशीत प्रवेश करतो. सूर्यदेवाच्या या संक्रमणाला मकर संक्रांत असं म्हणतात. सूर्यदेव 15 जानेवारीला पहाटे 2.43 ला धनु राशीतून मकर राशीत संक्रमण करणार आहे. यंदा मकर संक्रांतीला सूर्यदेवाची कृपा अधिक प्रभावशील 12 राशींवर पडणार आहे. सूर्यदेवाचं मकर राशीत गोचरसोबत मकर संक्रांतीला 77 वर्षांनी दुर्मिळ योग जुळून आला आहे. मकर संक्रांतीला रवि योग आणि वरियान योग यांची एकत्र संयोग होत आहे. त्याशिवाय तब्बल 5 वर्षांनी मकर संक्रांतीचा सण हा सोमवारी साजरा होणार आहे. सूर्य गोचर आणि रवि व वरियान योगची निर्मिती काही राशींसाठी धनलाभ घेऊन आला आहे. (Amazing yoga after 77 years of Makar Sankranti 2024 due to Sun transit or surya gochar 2024 People of this zodiac sign will be rich)

मेष रास (Aries Zodiac) 

या राशीच्या लोकांना मकर संक्रांतीपासून भरघोस यश मिळणार आहे. करिअरमध्ये चांगल्या संधी मिळणार असून यश मिळणार आहे. नोकरदारांनाही उत्तम मार्ग गवसणार आहे. परदेशात जाण्याचे योग आहेत. जोडीदारासोबतच नातं मधुर होणार आहे. भागीदारी व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होणार आहे.  

वृषभ रास (Taurus Zodiac) 

या लोकांना अनेक चांगल्या संधी लाभणार आहे. करिअरच्या दृष्टीने मकर संक्रांत खूप भाग्यवान असणार आहे. परदेशात नोकरी करणाऱ्यांना फायदा होणार आहे. या काळात नशीब तुमच्या बाजूने असणार आहे. आर्थिक स्थिती सुधारणार आहे. या काळात तुम्ही गुंतवणूक करून चांगले पैसे मिळवणार आहे. तुमचं नातं जोडीदारासोबत घट्ट होणार आहे. 

सिंह रास (Leo Zodiac) 

या राशीच्या लोकांना मकर संक्रांत लाभदायक ठरणार आहे. उद्योगधंदात अनपेक्षित धनलाभ होणार आहे. भागीदारीत काम करणाऱ्यांना हा योग लाभदायक असेल. या काळात तुम्हाला उच्च पातळीवरील नफा प्राप्त होणार आहे. नोकरदार लोकांना त्यांच्या प्रयत्नातून यश लाभणार आहे. या लोकांना आर्थिक लाभासह बढतीची शक्यता आहे. 

हेसुद्धा वाचा - Makar Sankranti 2024 : 14 की 15 जानेवारी कधी आहे मकर संक्रांत? जाणून मुहूर्त, सुगड पूजासह संपूर्ण माहिती

वृश्चिक रास (Scorpio Zodiac)  

या राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी यश मिळणार आहे. या काळातील प्रवास तुम्हाला लाभदायक ठरेल. भाऊ बहिणीसोबतचं नात मजबूत होणार आहे. या काळात तुम्हाला करिअरशी संबंधित प्रवास प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाणार आहे. तुमच्या जोडीदाराशी तुमचं नातं अधिक प्रेमळ आणि मजबूत होणार आहे. 

मीन रास (Pisces Zodiac) 

या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये उत्तम संधी मिळणार आहे. या कालावधीत तुम्ही पूर्णपणे समाधानी असाल. तुम्हाला प्रमोशन मिळणार आहे. या काळात, अनेक गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील. तुमच्या आयुष्यात आनंदी वातावरण असणार आहे. आर्थिक दृष्टिकोनातून तुम्हाला चांगले आर्थिक लाभ प्राप्त होणार आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)