Vipreet Rajyoga : 50 वर्षांनंतर महाविपरीत राजयोग! ग्रहांचा राजकुमार बुध करणार तुम्हाला मालामाल

Vipreet Rajyoga : बुद्धि, धन, व्यापार, संवाद, वाणी, करिअर कारक ग्रहाचा राजकुमार बुधामुळे महा विपरीत राजयोग निर्माण झाला आहे. त्यामुळे काही राशींवर बुधदेवाची कृपा बरसणार आहे.  

नेहा चौधरी | Updated: Nov 22, 2023, 10:57 AM IST
Vipreet Rajyoga : 50 वर्षांनंतर महाविपरीत राजयोग! ग्रहांचा राजकुमार बुध करणार तुम्हाला मालामाल title=
After 50 years mercury or budh planet made the maha vipreet rajyog these zodiac signs will give you wealth

Maha Vipreet Rajyoga : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या स्थितीला अतिशय महत्त्व असतो. प्रत्येक महिन्यात कुठला ना कुठला ग्रह आपली स्थिती बदतो. एका ठराविक वेळेनंतर तो एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. ग्रह्रांच्या या बदलामुळे मानवी जीवनावर त्याचा शुभ किंवा अशुभ परिणाम होतो. ग्रह जेव्हा गोचर करतात तेव्हा काही योग निर्माण होतात. 6 नोव्हेंबरला ग्रहांचा राजकुमार बुध देव वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे महाविपरीत राजयोगाची निर्मिती झाली आहे. याचा लाभ तीन राशींच्या लोकांना विशेष होणार आहे. (After 50 years mercury or budh planet made the maha vipreet rajyog these zodiac signs will give you wealth)

कन्या रास (Virgo Zodiac)  

महा विपरीत राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. या राशीचा स्वामी बुध असल्याने या लोकांना हा राजयोग वरदान ठरणार आहे. बुध ग्रह तृतीय भावात भ्रमण करत आहे. तर या राशीच्या सहाव्या घरात तो आहे. शनीच्या दशमात आणि राहूच्या नवव्या भावात घट झाल्यामुळे तुम्हाला फायदा होणार आहे. तुम्हाला अचानक धनलाभ होणार आहे. बुध संक्रमणाच्या प्रभावामुळं या राशीच्या लोकांना मालमत्ता किंवा वाहन खरेदीचे योग आहेत. व्यावसायिकांनाही चांगला फायदा होणार आहे. 

धनु रास (Sagittarius Zodiac)

महाविपरीत राजयोग या राशीच्या लोकांसाठी वरदानपेक्षा कमी नाही. बुध या राशीच्या 12व्या घरात तयार झाला आहे. राहू आणि शनि गोचरचा प्रभावही या राशीवर आहे. त्यामुळे या काळात नोकरी आणि व्यवसायात प्रगती घेऊन आला आहे. तुमच्यावरील कर्जाचं बोझ उतरणार आहे. तुमचं परदेशात जाण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. परदेशातील एखादे नातेवाईक तुम्हाला भेटू शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा राजयोग शुभ असून त्यांना मेहनतीचं फळ मिळणार आहे. 

हेसुद्धा वाचा - December Grah Gochar : डिसेंबर महिन्यात ग्रहांचं महागोचर! 5 ग्रह करणार तुम्हाला श्रीमंत

कर्क रास (Cancer Zodiac)   

महाविपरीत राजयोगामुळे या राशींच्या लोकांना चांगलाच फायदा होमार आहे. व्यवसायिकांवर बुधाची कृपा बरसणार आहे. बुध हा या राशीच्या तिसऱ्या आणि बाराव्या घराचा स्वामी आहे. तर शनि आणि राहु कर्मफल देणारे या ग्रहांचा प्रभाव या राशीवर आहे. त्यामुळे या लोकांना आर्थिक फायदा होणार आहे. जर तुमचे पैसे कुठे अडकले असेल तर तुम्हाला या राजयोगामुळे ते परत मिळणार आहे. तुमचे जोडीदारासोबत नातं मजबूत होणमार आहे. महागड्या आणि चैनीच्या वस्तू खरेदी करण्याचे योग आहेत. शेअर्स, बेटिंग आणि लॉटरीमधून धनलाभाचे योगदेखील आहे.  

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)