गोल्डन बॉय Neeraj Chopraचा डाएट जो विशीतील प्रत्येक तरुणासाठी ठरेल सर्वोत्तम

Neeraj Chopra Diet : सुवर्णपदक जिंकलेल्या नीरज चोप्राने पुन्हा एकदा भारतीयांची मान उंचावली आहे. या सगळ्या यशामागे नीरजचा डाएट अत्यंत महत्वाचा ठरतो. 

| Oct 05, 2023, 11:49 AM IST

Neeraj Chopra Fitness : चीन येथे होत असलेल्या एशियन गेम्समधील (Asian Games 2023) भालाफेक स्पर्धेत स्टार नीरज चोप्रा याने सुवर्णपदक पटकावलं. नीरजने  चौथ्या राऊंडमध्ये  88.88 मीटरचा थ्रो करत गोल्ड मेडलला गवासणी घातली आहे. अतिशय वेगवान हवेलाही मागे टाकत नीरज चोप्राचा भाला पुढे सरकतो, नीरजच्या या सगळ्या यशामागे त्याचे सातत्य आणि डाएट हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. 

वयाच्या 25 व्या वर्षी नीरजचा जबरदस्त डाएट पाहायला मिळतो. आपल्या भाल्याप्रमाणे लांब असलेल्या नीरजची रूंद छाती प्रत्येकाला आकर्षित करते. लहानपणी नीरज असा नव्हता त्यांचा आताचा सुडौल बांधा, शरीर हे त्याने त्याच्या फिटनेसने कमावलेलं आहे. लहानपणी अतिशय लठ्ठ असलेल्या नीरजची खिल्ली उडवली जायची. नीरजचे मित्र त्याची तब्बेतीवरून मस्करी करायचे. पण आता नीरज आपल्या फिटनेसची पूर्ण काळजी घेतो. तेव्हाच त्याचा भाला हवेचा चिरून दूरपर्यंत जातो. या निमित्ताने नीरजचा डाएट प्लान जाणून घेऊया. 

1/7

नीरज चोप्रा लहानपणी कसा होता

Neeraj Chopra Win Gold Medal in Asian Games 2023 Know His Diet at age of 25

नीरज चोप्रा लहानपणी अतिशय लठ्ठ होता. एका मुलाखतीत त्याने ही माहिती दिली होती. त्याचे मित्र अगदी त्याला लठ्ठपणावरून चिडवायचे. वजनाने अतिशय जास्त असलेल्या नीरजने आता स्वतःमध्ये खूप चांगला बदल केला आहे.

2/7

बॉडी फॅट ठेवतो मेंटन

Neeraj Chopra Win Gold Medal in Asian Games 2023 Know His Diet at age of 25

Olympics च्या रिपोर्टनुसार (Ref), भाला फेकणाऱ्या पुरूषांचे आयडियल बॉडी फॅट 10-10.15% च्या मध्ये मेंटेन ठेवणे गरजेचे आहे. नीरज चोप्रा आपल्या बॉडी फॅटला 10% पर्यंत ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्यापद्धतीने तिचा डाएट असतो. 

3/7

नाश्तामध्ये काय खातो नीरज चोप्रा

Neeraj Chopra Win Gold Medal in Asian Games 2023 Know His Diet at age of 25

नीरज चोप्रा आपला आहार साधा ठेवण्याचा प्रयत्न करतात. पौष्टिक नाश्ता केल्याने त्यांना त्यांच्या प्रशिक्षण सत्रासाठी भरपूर ऊर्जा मिळते. त्यांचा दिवस ज्यूस किंवा नारळाच्या पाण्याने सुरू होतो न्याहारीसाठी तीन-चार अंड्यांचा पांढरा भाग खातो ब्रेडचे दोन तुकडे एक वाटी दलिया आणि फळे खातो ब्रेड आणि ऑम्लेट हा त्याचा आवडता नाश्ता आहे जो तो आठवड्याच्या कोणत्याही दिवशी घेऊ शकतो. 

4/7

दुपारच्या जेवणात काय खातो

Neeraj Chopra Win Gold Medal in Asian Games 2023 Know His Diet at age of 25

दुपारच्या जेवणात नीरज दही आणि भातासोबत डाळ खातो ग्रिल्ड चिकन आणि सलाड खातो  ट्रेनिंग सेशन किंवा जिम दरम्यान तो ड्रायफ्रुट्स खास करून बदाम खातो  या दरम्यान तो फ्रेश ज्यूस देखील घेतो 

5/7

रात्रीच्या जेवणातील पदार्थ

Neeraj Chopra Win Gold Medal in Asian Games 2023 Know His Diet at age of 25

नीरज रात्रीच्या जेवणात खास करून सूप पितो  उकळलेल्या भाज्या आणि फळांचा समावेश असतो  आहारामध्ये जास्त करून फळे आणि भाज्यांचा समावेश करण्याचा प्रयत्न असतो

6/7

प्रोटीनवर देतो लक्ष

Neeraj Chopra Win Gold Medal in Asian Games 2023 Know His Diet at age of 25

नीरज चोप्राच्या आहारात फळे आणि प्रथिनांवर भर आहे.  प्रोटीन मसल्स तयार करण्यासाठी तसेच शरीरातील चरबी राखण्यासाठी प्रथिने आवश्यक असतात. दैनंदिन प्रथिनांची गरज भागवण्यासाठी तो प्रोटीन सप्लिमेंट्स देखील घेतो. सॅल्मन फिश अलीकडे नीरज चोप्राच्या आहाराचा एक भाग बनला आहे आणि प्रथिनांसाठी त्यांची पसंती बनत आहे.

7/7

चुरमा-पाणीपुरी आवडीची

Neeraj Chopra Win Gold Medal in Asian Games 2023 Know His Diet at age of 25

नीरज अत्यंत स्ट्रिक्ट डाएट प्लान फॉलो करतो. मात्र ज्या दिवशी चिट डे असतो तेव्हा तो हरियाणाच्या या तरूणाला चूरमा खायला आवडतो. तसेच पाणीपुरी देखील नीरज आवडीने खातो.