तुम्हाला इतरांपेक्षा जास्त थंडी वाजते का? 'या' व्हिटॅमिनची असू शकते कमतरता, दुर्लक्ष करू नका

हिवाळा ऋतू आल्याने थंडीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेकांच्या घरातून जॅकेट, शॉल आणि इतर गरम कपडे बाहेर आले असतील. तुम्ही पाहिलं असेल किंवा अनुभवलं देखील असेल की काही लोकांना इतरांपेक्षा जास्त थंडी वाजते. मात्र यामागचं कारण हे शोधण्याचा अनेकजण प्रयत्न करत नाहीत आणि यामुळे पुढे जाऊन आरोग्याच्या विविध समस्या जाणवू लागतात. यामागे शरीरातील व्हिटॅमिन्सची कमतरता असू शकते. असं का घडत आणि त्याचे उपाय काय याविषयी जाणून घेऊयात.  

| Nov 27, 2024, 19:55 PM IST
1/7

शरीरातील थर्मोरेग्युलेशनसाठी अनेक जीवनसत्त्वे कार्य करतात. तेव्हा शरीरात कोणत्या जीवनसत्त्वांची कमतरता निर्माण झाली की थंडी जास्त जाणवते याविषयी माहिती घेऊयात.   

2/7

शरीराचं तापमान कसं नियंत्रित राहतं?

 शरीराचं तापमान राखणे याला थर्मोरेग्युलेशन असे म्हणतात. व्हिटॅमिन बी 12, फोलेट आणि लोह सारख्या जीवनसत्वाची कमतरता शरीरात झाली की शरीराची उष्णता टिकवून ठेवण्याची क्षमता कमी होते आणि मग अशा व्यक्तींना जास्त थंडी वाजू लागते. 

3/7

शरीरात उष्णतेसाठी आयरन का गरजेचं?

 शरीरात हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी आयरनची आवश्यकता असते.  हिमोग्लोबिन हे लाल रक्तपेशींमध्ये असून हे तुमच्या शरीरात ऑक्सिजन पोहोचवण्याचे कार्य करते. शरीरात आयरनची कमी झाली की हिमोग्लोबिन कमी होऊन ऑक्सिजन योग्यरीत्या शरीरात पोहोचत नाही आणि स्नायूंमध्ये उष्णता निर्माण होत नाही. यामुळे लोकांना जास्त थंडी वाजणे, थकवा, अशक्तपणा सारख्या समस्या जाणवतात.    

4/7

व्हिटॅमिन बी 12 कमतरता :

व्हिटॅमिन बी 12 हे शरीरातील लाल रक्तपेशी आणि मेंदूच्या कार्यासाठी महत्वाचे ठरते. जर शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता झाल्यास लाल रक्त पेशी निर्माण होत नाहीत, यामुळे ॲनिमिया सुद्धा होऊ शकतो. परिणामी हात पाय सारख्या अवयवांना जास्त थंडी वाजते. 

5/7

व्हिटॅमिन C आणि आयरन अब्‍जॉर्ब्‍शन :

व्हिटॅमिन C त्वचेच्या आरोग्यासाठी महत्वाचे असते. परंतु त्याची शरीरात कमतरता झाली की जास्त थंडी वाजायला सुरुवात होते. आयरन शरीरासाठी किती महत्वाचं आहे हे तुम्ही ऐकलत मात्र काही वेळा ते खाल्ल्यानंतरही आयरनची कमतरता जाणवते, कारण शरीरात व्हिटॅमिन सी ची कमतरता असते. शरीरात आयरन शोषण्यासाठी व्हिटॅमिन सी आवश्यक आहे.   

6/7

जर तुम्हाला इतरांपेक्षा जास्त थंडी वाजत असेल तर तुमच्या शरीरात यापैकी कोणत्यातरी व्हिटॅमिनची कमतरता असू शकते. त्यामुळे अशी लक्षण तुम्हाला जाणवत असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा.  

7/7

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)