ऑफिसमध्ये रोमान्स करणाऱ्यांना 'ही' कंपनी देतीये बक्षीस; नेटकरी म्हणतात, आमच्याकडे ही पॉलिसी कधी येणार?

एखादं ऑफिसच तुम्हाला रोमान्स करण्यासाठी प्रोत्साहन देत असेल तर? हो. असं घडलंय. जिथे ऑफिसमध्ये रोमान्स केल्यास तुम्हाला बक्षिस मिळतं. कुठे आहे असं ऑफिस? काय आहे यामागचं कारण? सर्वकाही जाणून घेऊया.

| Nov 27, 2024, 19:57 PM IST

Office Romance:एखादं ऑफिसच तुम्हाला रोमान्स करण्यासाठी प्रोत्साहन देत असेल तर? हो. असं घडलंय. जिथे ऑफिसमध्ये रोमान्स केल्यास तुम्हाला बक्षिस मिळतं. कुठे आहे असं ऑफिस? काय आहे यामागचं कारण? सर्वकाही जाणून घेऊया.

1/9

ऑफिसमध्ये रोमान्स करणाऱ्यांना 'ही' कंपनी देतीये बक्षीस; नेटकरी म्हणतात, आमच्याकडे ही पॉलिसी कधी येणार?

Romance in office Company give prize to Employee who is dating Trending News

Office Romance: ऑफिस म्हणजे आपल्या कामाच ठिकाणं. जिथे आपण दिवसाचे 8-10 तास काम करतो, ज्याचा आपल्याला पगार मिळतो. ऑफिसमध्ये आपण तिथल्या वातावरणाप्रमाणे राहतो. खासगी आयुष्यातील नाती, घरची भांडणं अशी कोणती प्रकरण ऑफिसपासून दूर ठेवली जातात. कारण या सर्वाचा आपल्या कामावर परिणाम होत असतो.

2/9

रोमान्स करण्यासाठी प्रोत्साहन

Romance in office Company give prize to Employee who is dating Trending News

पण एखादं ऑफिसच तुम्हाला रोमान्स करण्यासाठी प्रोत्साहन देत असेल तर? हो. असं घडलंय. जिथे ऑफिसमध्ये रोमान्स केल्यास तुम्हाला बक्षिस मिळतं. कुठे आहे असं ऑफीस? काय आहे यामागचं कारण? सर्वकाही जाणून घेऊया.

3/9

रोख बक्षीस

Romance in office Company give prize to Employee who is dating Trending News

एक चिनी कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना रोमान्स करण्यासाठी प्रोत्साहन देतय. कर्मचाऱ्यांनी असे केल्याने त्यांना रोख बक्षीस देण्यात येईल, असे कंपनीने जाहीर केले आहे. हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल होतंय.

4/9

कंपनीची विचित्र पॉलिसी

Romance in office Company give prize to Employee who is dating Trending News

इंस्टा 360 असे या कंपनीचे नाव आहे. ही कंपनी चिनी कॅमेरा बनवते. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये रोमान्स करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. यासाठी कंपनी कर्मचाऱ्यांना रोख बक्षीस देते.

5/9

डेटिंगसाठी मिळेल बक्षीस

Romance in office Company give prize to Employee who is dating Trending News

ऑनलाइन डेटिंग प्लॅटफॉर्मवर खरी माहिती शेअर केली तर त्यांना ¥66 म्हणजेच अंदाजे 750 रुपये बक्षीस मिळेल.

6/9

किती रुपये मिळतील?

Romance in office Company give prize to Employee who is dating Trending News

एखाद्या कर्मचाऱ्याला डेटिंग प्लॅटफॉर्मवर जोडीदार सापडला आणि त्याचे नाते किमान 3 महिने टिकले तरी दोघांना प्रत्येकी 1 हजार येन म्हणजेच अंदाजे 1,200 रुपये बक्षीस मिळेल.

7/9

कंपनीचे उद्दिष्ट काय?

Romance in office Company give prize to Employee who is dating Trending News

हे सर्व करुन कंपनीला काय फायदा? असा प्रश्न तुम्हालादेखील पडला असेल. तर कंपनीने यावर स्पष्टीकरण दिले आहे. कर्मचाऱ्यांमध्ये आपलेपणा आणि आनंदाची भावना' वाढवणे हा आमचा उद्देश असल्याचे कंपनी इंस्टा 360 ने म्हटले आहे.

8/9

कसा मिळतोय प्रतिसाद?

Romance in office Company give prize to Employee who is dating Trending News

कंपनीने हे कॅम्पेन सुरु केल्यापासून सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात ही पोस्ट व्हायरल होतेय. कंपनीने आतापर्यंत कर्मचाऱ्यांना ¥10,000 पेक्षा जास्त रक्कमेची बक्षीस दिली आहेत.

9/9

सोशल मीडियावर चर्चा

Romance in office Company give prize to Employee who is dating Trending News

या अनोख्या कॅम्पेनबद्दल सोशल मीडियात खूप चर्चा रंगतेय. अशी संधी आमच्याकडे का येत नाही? असा प्रश्न लोक विचारतायत.