World Cup Schedule: मुंबई, पुण्यातही सामने! कोणत्या तारखेला, कोणत्या मैदानात, कोणाविरुद्ध खेळणार टीम इंडिया

World Cup 2023 Team India Schedule: 45 दिवस चालणाऱ्या वर्ल्डकप स्पर्धेमध्ये भारतीय संघ वर्ल्डकपचे सामने कधी, कुठे आणि किती वाजता खेळणार आहे? कोणत्या संघाविरुद्धचा सामना कधी खेळवला जाणार आहे जाणून घेऊयात याचसंदर्भातील सविस्तर माहिती...

| Oct 05, 2023, 09:25 AM IST
1/17

ODI World Cup 2023 Team India Schedule Complete List of Fixtures And Timings

भारतीय संघांचं संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या. विशेष म्हणजे भारताचे 2 सामने महाराष्ट्रात होणार आहे. यापैकी एक सामना मुंबईत तर दुसरा पुण्यात खेळवला जाणार आहे. नेमके कुठे आणि कधी होणार हे सामने पाहूयात वेळापत्रक...

2/17

ODI World Cup 2023 Team India Schedule Complete List of Fixtures And Timings

भारतामध्ये आजपासून पुढील 45 दिवस 10 संघ एकदिवसीय क्रिकेटचा वर्ल्डकप जिंकण्यासाठी जीवाचं रान करणार आहेत. नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज इंग्लंड आणि न्यूझीलंडदरम्यान होणाऱ्या सामन्यापासून वर्ल्डकप 2023 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेमध्ये संभाव्य विजेता म्हणून भारतीय संघाकडे पाहिलं जात आहे.

3/17

ODI World Cup 2023 Team India Schedule Complete List of Fixtures And Timings

भारतीय संघही 2011 प्रमाणे घरच्या मैदानांवर खेळताना जेतेपदावर नाव कोरण्याच्या विचारानेच मैदानात उतरेल यात शंका नाही. भारताने यापूर्वी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं तेव्हा कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा एकदिवसीय वर्ल्डकप जिंकला होता. अशीच कामगिरी पुन्हा करण्याचा रोहित शर्मा आणि टीमचा इरादा असेल याच शंका नाही.

4/17

ODI World Cup 2023 Team India Schedule Complete List of Fixtures And Timings

वर्ल्डकप स्पर्धेआधी भारताने आशिया चषक स्पर्धा जिंकली आहे. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्धची 3 सामन्याची मालिकाही भारताने 2-1 च्या फरकाने जिंकली. ही वर्ल्डकप स्पर्धा विराट कोहली आणि रोहित शर्माची अंतिम वर्ल्डकप स्पर्धा असणार आहे असं म्हटलं जात आहे. तसेच रविचंद्रन अश्वीनसाठीही ही शेवटची वर्ल्डकप स्पर्धा असेल असं सांगितलं जात आहे.

5/17

ODI World Cup 2023 Team India Schedule Complete List of Fixtures And Timings

दुसरीकडे शुभमन गील आणि इशान किशन यांच्यासाठी हा पहिलाच वर्ल्डकप असणार आहे. गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर जसप्रीत बुमराहच्या कामगिरीकडे भारतीय चाहत्यांचं विशेष लक्ष असणार आहे.

6/17

ODI World Cup 2023 Team India Schedule Complete List of Fixtures And Timings

भारत या मालिकेमध्ये कोणत्या संघाविरुद्ध कधी सामना खेळणार आहे आणि हे सामने किती वाजता होणार आहेत जाणून घेऊयात...

7/17

ODI World Cup 2023 Team India Schedule Complete List of Fixtures And Timings

वर्ल्डकपमधील भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईमध्ये होणार आहे. हा सामना दुपारी 2 वाजता सुरु होईल.  

8/17

ODI World Cup 2023 Team India Schedule Complete List of Fixtures And Timings

रोहितच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दुसरा सामना 11 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार आहे. हा सामना नवी दिल्लीमध्ये होणार आहे. हा सामना दुपारी 2 वाजता सुरु होईल.

9/17

ODI World Cup 2023 Team India Schedule Complete List of Fixtures And Timings

भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा हाय व्होल्टेज सामना 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर दुपारी 2 वाजता सुरु होईल.

10/17

ODI World Cup 2023 Team India Schedule Complete List of Fixtures And Timings

भारताचा वर्ल्डकप स्पर्धेमधील चौथा सामना पुण्यात होणार आहे. हा सामना 19 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध मैदानात उतरेल.

11/17

ODI World Cup 2023 Team India Schedule Complete List of Fixtures And Timings

भारताची खरी परीक्षा 22 ऑक्टोबर रोजी असेल. या दिवशी भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध धरमशाला येथील मैदानात उतरणार आहे. भारताला मागील 20 वर्षात आयसीसी स्पर्धेत एकदाही न्यूझीलंडला पराभूत करता आलेलं नाही.

12/17

ODI World Cup 2023 Team India Schedule Complete List of Fixtures And Timings

29 ऑक्टोबर रोजी भारताचा सहावा सामना इंग्लंडविरुद्ध लखनऊमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना दुपारी 2 वाजता सुरु होईल.

13/17

ODI World Cup 2023 Team India Schedule Complete List of Fixtures And Timings

भारतीय संघ मुंबईमध्ये 2 नोव्हेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध वर्ल्डकप स्पर्धेतील आपला सातवा सामना खेणार आहे. हा सामना वानखेडे मैदानामध्ये दुपारी 2 वाजता सुरु होईल.

14/17

ODI World Cup 2023 Team India Schedule Complete List of Fixtures And Timings

यानंतर 3 दिवसांनी म्हणजेच 5 नोव्हेंबर रोजी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मैदानात उतरणार आहे. कोलकात्यामध्ये होणारा हा सामना दुपारी 2 वाजता सुरु होईल.

15/17

ODI World Cup 2023 Team India Schedule Complete List of Fixtures And Timings

भारताचा साखळी फेरीतील नववा सामना 11 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना नेदरलँडविरुद्ध खेळवला जाणार आहे. बंगळुरुमध्ये दुपारी 2 वाजता हा सामना सुरु होईल.

16/17

ODI World Cup 2023 Team India Schedule Complete List of Fixtures And Timings

भारतीय संघ असा असेल? - रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार ), के. एल. राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, इशान किशन, रविंद्र जडेजा

17/17

ODI World Cup 2023 Team India Schedule Complete List of Fixtures And Timings

भारतीय गोलंदाजीची धुरा आर. अश्वीन, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव यांच्यावर असणार आहे.