PHOTO : टीव्हीवर पदार्पण, पहिलाच चित्रपट सुपरहिट; मोठ्या दिग्दर्शकाशी लग्न करणारी या अभिनेत्रीला व्हायचं होतं IAS

Entertainment : फोटोमधील चिमुकली आज एक प्रसिद्ध अभिनेत्री असून एका मुलाची आई आहे. टीव्हीवरील त्या क्रीमच्या जाहिरातीनंतर तिला बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला. तुम्ही ओळखला का या अभिनेत्रीला?

| Nov 27, 2024, 19:19 PM IST
1/9

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांची सुरुवात ही छोट्या पडद्यावरून होते. त्यातील एक नाव आहे शाहरुख खान, पण आज आपण अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत, तिला एका क्रीमच्या जाहिरातून थेट बॉलिवूडमधील चित्रपट मिळाला. एवढंच नाही तर पहिला वहिला चित्रपट सुपरहिट ठरला. 

2/9

वयाच्या 20 व्या वर्षी ती मुंबईत शिफ्ट झाली. टीव्हीनंतर चित्रपटातून एकामागोमाग अनेक हिट चित्रपटात तिने काम केलं. तुम्ही ओळखला का या चिमुकलीला....नाही तर ही आहे यामी गौतमी. तिच्या जन्म 28 नोव्हेंबर 1988 ला हिमाचल प्रदेशामध्ये झाला. 

3/9

यामीची पहिली मालिका 'चांद के पार चलो' (2008) होती जी त्यावेळी NDTV Imagine वाहिनीवर प्रसारित झाली होती. यात त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती. त्याच वर्षी त्यांची 'ये प्यार ना होगा कम' ही दुसरी मालिका आली. या सीरियलमध्ये यामीची दखल घेण्यात आली आहे. 

4/9

बॉलिवूडमधील तिचा पहिला चित्रपट 2012 मध्ये 'विकी डोनर' होता ज्यामध्ये ती आयुष्मान खुरानासोबत होती. हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटापासून यामीच्या करिअरला सुरुवात झाली. 

5/9

2015 मध्ये यामीचा बदलापूर हा आणखी एक हिट चित्रपट आला. या चित्रपटात वरुण धवन आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्यानंतर तिने हृतिक रोशनसोबत काबिल हा चित्रपट केला.

6/9

2019 मध्ये, यामीचा चित्रपट 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' प्रदर्शित झाला जो त्या वर्षातील ब्लॉकबस्टर ठरला. चित्रपटाने केवळ थिएटरमध्येच प्रचंड नफा कमावला नाही तर प्रत्येक पुरस्कार सोहळ्यात पुरस्कारही मिळवले. 

7/9

यामीने 2021 मध्ये दिग्दर्शक आदित्य धरशी लग्न केलं. त्यांच्या लग्नाच्या लव्हस्टोरीची कोणालाच कल्पना नव्हती. त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आल्यावर ही बाब समोर आली. यामीने हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, उरीच्या प्रमोशनदरम्यान ते जवळ आले होते. मग ते एकमेकांशी बोलू लागले आणि मैत्रीतून या नात्याचे रुपांतर प्रेमात झालं. 

8/9

यामीने नेहमीच आयएएस होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. पण असं म्हणतात की आयुष्यात जे नशिबाला मान्य असेल तेच घडतं. या अभिनेत्रीला तिच्या वडिलांच्या मित्राच्या पत्नीने अभिनयाचे स्वप्न दाखवले होते. यामीला अभिनेत्री बनण्याचे सर्व गुण असल्याचे सांगितले होते.

9/9

यामी गौतम पती आदित्य धरपेक्षा श्रीमंत आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर यामी गौतम आज जवळपास 99 कोटी रुपयांच्या मालमत्तेची मालक आहे. एका चित्रपटासाठी ती 5 ते 8 कोटी रुपये फी घेते.