अभिनेत्याचा जन्मानंतर आईचं निधन, वयाच्या 13 व्या वर्षी ड्रग्सचं व्यसन; पहिलं लग्न मोडल्यानंतर आता करणार दुसरं लग्न

Entertainment : बॉलिवूडमधील हा स्टारकिड आई वडिलांसारखं नाव कमावू शकला नाही. त्याचा जन्मानंतर 15 दिवसांमध्येच आईचं निधन झालं. विवाहबाह्य संबंधातून त्याचा जन्म झाल्यामुळे आजी विद्याताई पाटील आणि मावशी मन्या पाटील यांनी त्याचं संगोपन केलं. 

Nov 27, 2024, 20:34 PM IST
1/7

28 नोव्हेंबर 1986 रोजी जन्मलेला प्रतीक बब्बर हा ज्येष्ठ अभिनेते-राजकारणी राज बब्बर आणि अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा आहे. प्रतीकच्या जन्मानंतर बाळाच्या जन्माच्या गुंतागुंतीमुळे अभिनेत्रीचं निधन झालं. विशेष म्हणजे एकेकाळी प्रतीक त्याचे वडील राज बब्बरचा खूप तिरस्कार करत होता.

2/7

प्रतीक बब्बरच्या बॉलिवूड पदार्पण जाने तू... या जाने ना (2008) मधील चित्रपटातून झालं. या चित्रपटात मुख्य अभिनेत्री जेनेलिया डिसूझाच्या भावंडाची भूमिका प्रतीकने केली होती.

3/7

प्रतिक बब्बरचे वडील राज यांचं लग्न ज्येष्ठ रंगमंच कलाकार नादिरा झहीर बब्बर यांच्याशी झालं होतं. या लग्नातून त्यांना दोन मुलं आर्या आणि जुही होते. लग्ना आणि दोन मुलं असतानाही राज बब्बर स्मिता पाटीलच्या प्रेमात पडले. नादिराला सोडून ते स्मितासोबत राहिला गेले. विवाहबाह्य संबंधामुळे राज आणि स्मिता यांनी त्या काळात समाजाला तोंड द्यावे लागले.  डिसेंबर 1986 मध्ये स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर, राज बब्बर पहिली पत्नी नादिरा बब्बरकडे परले. नादिरा यांनी स्मिताचा मुलगा प्रतीकचा स्विकार केला. 

4/7

खरं तर, प्रतीकच्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक बाब म्हणजे त्याच्या जन्मानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्याची आई जाणं. या एकटेपणाने प्रतीकलाही चुकीच्या मार्गावर घेऊन गेले. वयाच्या 13 व्या वर्षी त्याला ड्रग्जचे गंभीर व्यसन लागले होते. यानंतर वयाच्या 17 व्या वर्षी त्यांना पुनर्वसन केंद्रात जावे लागलं होतं, तेव्हाच ते या व्यसनातून मुक्त होऊ शकला.  

5/7

त्याने फोर मोअर शॉट्स प्लीज! या वेबसीरिजमध्ये काम केलं. त्याचा या कामाचं खूप कौतुक झालं. त्याची व्यक्तिरेखा चाहत्यांना आवडली. 

6/7

वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर प्रतीकने सान्या सागरशी लग्न केले. हे लग्न फार काळ टिकले नाही. 2019 मध्ये त्यांनी लग्न केले आणि 2023 मध्ये वेगळे झाले. आता तो प्रिया बॅनर्जीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

7/7

सोशल मीडियावर तो अनेकदा प्रियासोबत लिपलॉक फोटोंसोबतच अनेक रोमँटिक फोटोही शेअर करतो. लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर या दोघांनी साखरपुडा केलाय. 27 नोव्हेंबर 2024 ला त्यांचा साखरपुड्याला एक वर्ष झाली आहेत. हा आनंद त्याने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केला आहे.