Metro 4 अंतर्गत मुंबई ते ठाणेकरांना घरापासून स्टेशनपर्यंत 'अशी' असेल सुविधा

MMRDA Metro 4: सुमारे 35 किलोमीटरच्या मार्गावर मेट्रो-4 बांधण्यात येत आहे. या मार्गावरून दररोज लाखो प्रवासी ये-जा करतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Pravin Dabholkar | Nov 03, 2023, 09:44 AM IST

MMRDA Metro 4: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआर) सर्वात लांब मेट्रो मार्गावरून हे काम सुरू करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

1/10

मेट्रो 4 मध्ये मुंबई ते ठाणेकरांना घरापासून स्टेशनपर्यंत 'अशी' असेल सुविधा

MMRDA Mumbai Thanekar travel fast and comfortable Metro 4 will be connected to bus stop rickshaw stand footpath

Mumbai Metro line 4 : एमएमआरडीएने नव्या मार्गावर मेट्रो सेवा सुरू करण्यापूर्वी घरापासून स्टेशनपर्यंत प्रवाशांसाठी सुविधा विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच्या चुकांमधून धडा घेत प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रोने महत्वाचा निर्णय घेतला आहे.

2/10

सर्वात लांब मेट्रो मार्ग

MMRDA Mumbai Thanekar travel fast and comfortable Metro 4 will be connected to bus stop rickshaw stand footpath

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआर) सर्वात लांब मेट्रो मार्गावरून हे काम सुरू करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

3/10

काम सुरू होणार

MMRDA Mumbai Thanekar travel fast and comfortable Metro 4 will be connected to bus stop rickshaw stand footpath

मेट्रो-4 कॉरिडॉरजवळील परिसरात मल्टीमॉडल इंटिग्रेशन ट्रान्सपोर्ट सिस्टीम तयार करण्याचे काम सुरू होणार आहे. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन लास्ट माईल कनेक्टिव्हिटी तयार केली जात आहे. या कामावर देखरेख ठेवण्यासाठी एमएमआरडीएकडून विशेष सल्लागार नेमण्यात येणार आहे. 

4/10

दररोज लाखो प्रवासी

MMRDA Mumbai Thanekar travel fast and comfortable Metro 4 will be connected to bus stop rickshaw stand footpath

सुमारे 35 किलोमीटरच्या मार्गावर मेट्रो-4 बांधण्यात येत आहे. या मार्गावरून दररोज लाखो प्रवासी ये-जा करतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मेट्रो स्टेशनवरून उतरणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या अंतिम स्थळी सहज पोहोचता यावे यासाठी लास्ट माईल कनेक्टिव्हिटी असेल. 

5/10

आराखडाही तयार

MMRDA Mumbai Thanekar travel fast and comfortable Metro 4 will be connected to bus stop rickshaw stand footpath

याअंतर्गत स्टेशन परिसराजवळ बस स्टॉप, ऑटो स्टँड, फूटपाथ, सायकल ट्रॅक, माहिती फलक यासह इतर सुविधा विकसित केल्या जातील. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालना देण्यासाठी फीडर बस सेवा सुरू करण्याचा आराखडाही तयार करण्यात आला आहे.

6/10

35 किलोमीटर मार्गावर मेट्रो सेवा

MMRDA Mumbai Thanekar travel fast and comfortable Metro 4 will be connected to bus stop rickshaw stand footpath

गेल्या वर्षी मेट्रो-7 आणि मेट्रो-2 ए या 35 किलोमीटर मार्गावर मेट्रो सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र स्टेशन परिसराजवळ पुरेशी शेवटची जोडणी नसल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

7/10

लास्ट माईल कनेक्टिव्हिटी

MMRDA Mumbai Thanekar travel fast and comfortable Metro 4 will be connected to bus stop rickshaw stand footpath

मेट्रो 97 आणि मेट्रो-2 ए पासून धडा घेत मेट्रो-4 च्या बांधकामादरम्यान लास्ट माईल कनेक्टिव्हिटी विकसित करण्याची तयारी सुरू झाली आहे.  

8/10

पहिल्या पॅकेजमधीस 16 स्थानके

MMRDA Mumbai Thanekar travel fast and comfortable Metro 4 will be connected to bus stop rickshaw stand footpath

मेट्रो-4 च्या पहिल्या पॅकेजमधील 16 स्थानकांवरून लास्ट माईल कनेक्टिव्हिटी सुरू होईल. लवकरच इतर स्थानकांवरही हे काम सुरू होईल. एमएमआरडीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबद्दल माहिती दिली.

9/10

ठाणे-मुंबई मेट्रोने जोडणार

MMRDA Mumbai Thanekar travel fast and comfortable Metro 4 will be connected to bus stop rickshaw stand footpath

ठाणे ते मुंबईला जोडणाऱ्या मेट्रो-4 ची सेवा दोन टप्प्यात सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात घोडबंदर रोड ते मुलुंड दरम्यान मेट्रो धावणार आहे. मेट्रो-4 कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्यावर 2025 पर्यंत सेवा सुरू करण्याच्या योजनेवर MMRDA काम करत आहे. 

10/10

वडाळा-कासारवडवली-गायमुख

Metro Multimodal  Integration Transport System

वडाळा-कासारवडवली-गायमुख दरम्यान मेट्रो-4 आणि मेट्रो-4A बांधण्यात येत आहेत. मेट्रो-4 चे बांधकाम 58 टक्के आणि मेट्रो-4 ए चे काम 61 टक्के पूर्ण झाले आहे.